Homeमनोरंजनअभिनेत्री प्राजक्ता माळी गश्मीर महाजनी फुलवंतीची मोठी घोषणा आता हिंदीत फक्त Amazon...

अभिनेत्री प्राजक्ता माळी गश्मीर महाजनी फुलवंतीची मोठी घोषणा आता हिंदीत फक्त Amazon Prime वर


प्रकल्प माली: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांची ओळख कायम राहिली आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता याच जोडीने त्यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठं सरप्राइज जाहीर केलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत सांगितले की, ‘फुलवंती’ आता तुम्हाला हिंदीमध्ये भाषेत बघता येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं हिंदीत डबिंग स्वतः प्राजक्ता आणि गश्मीर यांनीच केलं आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या मूळ आवाजातच ‘फुलवंती’चा आनंद घेता येणार आहे.

चित्रपटातील सर्व गाणीदेखील हिंदीत रेकॉर्ड करून प्रदर्शित करण्यात आली आहेत. मराठी प्रेक्षकांनंतर आता हिंदी भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मराठी चित्रपट राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी हा प्रयत्न’

हिंदी डबिंगसंदर्भात बोलताना गश्मीर महाजनी म्हणाला, ‘मराठी चित्रपटसृष्टीचं कंटेंट राष्ट्रीय स्तरावर पोहोचायला हवं. ‘फुलवंती’ हिंदीत डब करण्यामागचा उद्देश हाच आहे. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा.

प्राजक्ता आणि गश्मीरने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. मराठी चाहत्यांसह हिंदी प्रेक्षकांनीही यावर उत्साह व्यक्त केला.

लवकरच एक नवा प्रोजेक्ट

व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि गश्मीर यांनी आणखी एक माहिती दिली.  ते लवकरच एका नव्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांसमोर येणार आहेत!. मात्र, प्रकल्पाची माहिती अद्याप गुप्त ठेवत त्यांनी चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

प्राजक्ता माळी सौंदर्य, अभिनय, आकर्षक व्यक्तिमत्त्व, दमदार सूत्रसंचालन आणि स्टायलिश फॅशन सेन्समुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे तिने घराघरात आपली जागा निर्माण केली. तर डॅशिंग लूक, परफेक्ट स्क्रीन प्रेझेन्स आणि दमदार अभिनयामुळे गश्मीरनेही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. ‘देऊळ बंद’, ‘काहे दिया परदेस’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना विशेष दाद मिळाली.

एकंदर पाहता ‘फुलवंती’चा हिंदी अवतार आणि येणाऱ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा. या दोन बातम्यांनी प्राजक्ता–गश्मीर चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. मराठी चित्रपटसृष्टी राष्ट्रीय स्तरावर पोहोचत असल्याची ही आनंददायक पावलं आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!