Homeमनोरंजनऑटो न्यूज टोयोटा कार अर्बन क्रूझर हायराइडर बजेट कार नवीनतम अपडेट

ऑटो न्यूज टोयोटा कार अर्बन क्रूझर हायराइडर बजेट कार नवीनतम अपडेट


टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर: काही कंपन्यांच्या कारना त्यांच्या रॉयल लूक आणि खिशाला परवडणाऱ्या बजेटमुळं कारप्रेमी कायमच पसंती देतात. त्यातही काही कारचे मॉडेल हे मध्यमवर्गीयांसाठी जणू आलिशान राहणीमानाचं प्रतीक. अशाच कारची निर्मिती करणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीनं नुकताच एक मोठा निर्णय घेत आपल्या कंपनीच्या कारचे विक्री झालेले युनिट परत मागवले आहेत. मारुती सुझूकीच्या ग्रँड विटारा मॉडेलमध्ये झालेल्या बिघाडानंतर आता टोयोटाच्या अर्बन क्रूझर हायरायडर (Toyota Urban Cruiser Hyryder) कारमध्येही अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळं कंपनीनं हे युनिट परत मागवले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

टोयोटानं याबाबतच्या वृत्तावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलं असून, अर्बन क्रूझर हायरायडरच्या ज्या मॉडेलमध्ये अॅनालॉग इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर लावण्यात आलं आहे त्या कार प्रभावित झाल्या असून, त्यांची निर्मिती 9 डिसेंबर 2024 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान झाल्याचं सांगितलं. ज्यामुळं कंपनीच्या एकूण 11529 कारचे युनिट परत मागवण्यात आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार जे मॉडेल परत मागवण्यात आले आहेत, त्यांमध्ये फ्यूल लेवल इंडिकेटरमध्ये खराबी असल्याची बाब समोर आली असून, एसयुव्हीच्या फक्त पेट्रोल युनिटनाच परत मागवण्यात आलं आहे. अनेकदा या कारमध्ये असणाऱ्या या तांत्रिक बिघाडामुळं इंधनाबाबतची योग्य माहिती दाखवली जाऊ शकत नाही. ज्यामुळं इंधन संपूनही कार तसे कोणतेही संकेत देत नाही. परिणामी अनेकदा कारचालकांची पंचाईत होते. दूरच्या प्रवासादरम्यान ही समस्या अधिक मोठी असू शकते ही बाब हेरत सावधगिरी म्हणून कंपनीनं कारचे मॉडेल रिकॉल केले आहेत.

टोयोटानं जारी केलेल्या माहितीनुसार ज्या कार परत मागवल्या आहेत त्यामध्ये कारमालकांना ईमेल, फोन, मॅसेजद्वारी याबाबतची माहिती दिली जाणार आहे. ज्यानंतर जवळच्या कार सर्विस सेंटरमध्ये कार नेत तिथं त्यांचं प्रभावित युनिटची तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर ज्या मॉडेलमध्ये बिघाड आढळेल त्याची तातडीनं दुरूस्ती केली जाणार असून, या दुरूस्तीची सर्व जबाबदारी कंपनीची असून ग्राहकांकडून त्यासाठी कोणतंही आर्थिक शुल्क आकारलं जाणार नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

टोयोटानं नेमकं कशासाठी रिकॉल जाहीर केलं आहे?
अर्बन क्रूझर हायरायडरच्या काही युनिट्समध्ये फ्यूल लेव्हल इंडिकेटर (इंधन गेज) मध्ये त्रुटी आढळली आहे. यामुळे इंधन पातळी योग्य दिसत नाही आणि लो-फ्यूल वॉर्निंग लाइट येत नाही. परिणामी गाडी दूरच्या प्रवासात अचानक इंधन संपून थांबू शकते.

किती गाड्या प्रभावित झाल्या आहेत?
एकूण 11529 युनिट्स रिकॉल करण्यात आल्या आहेत. याची निर्मिती 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 या कालावधीत झाली आहे.

दुरुस्तीचा खर्च कोण भरेल?
पूर्णपणे मोफत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची तपासणी आणि गरज पडली तर बदलण्याची जबाबदारी टोयोटाची आहे. ग्राहकांकडून एकही पैसा घेतला जाणार नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!