Homeमनोरंजनसोशल मीडियावर प्रभाव टाकणारा ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरी याला मुंबई पोलिसांनी २५२...

सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरी याला मुंबई पोलिसांनी २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहे.


२५२ कोटी रुपयांचे ड्रग्ज प्रकरण: देश-विदेशातील ड्रग्ज पाट्यांमध्ये कलाकार आणि राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यानंतर, मुंबई पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ओरी याला आज, गुरुवारी जबाब देण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 252 कोटी रुपयांच्या या मेप्हेड्रोन (MD) ड्रग्स प्रकरणात ओरीला सकाळी 10 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दुबई कनेक्शन

अंमली पदार्थविरोधी पथकाने एमडी ड्रग्जच्या सुमारे अडीचशे प्रकरणांत संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) प्रत्यार्पण करून आणलेला आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याने बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते यांच्यासाठी देशात आणि विदेशात ड्रग्ज पार्चा आयोजित केल्याचे पोलिस चौकशीत सांगितले आहे.

अनेक सेलिब्रिटींची घेतली नावं

सलीम याने अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता दिग्दर्शक अब्बास-मस्तान, माजी आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान, दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, रॅपर लोका यांच्यासह अनेकांसाठी पाट्यांचे आयोजन करण्याबरोबरच त्यांना अंमली पदार्थ पुरविल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी त्याची कोठडी न्यायालयात केला.

ओरीकडून पोलीस कोणती माहिती घेणार?

आता पोलिस ओरीकडून त्याच्या दुबई ट्रीप्स, पार्टीज, कॉन्टॅक्ट्स याबाबत विचारणा करणार आहेत. सलीमच्या जबाबामुळे हे प्रकरण आता फॉलो-अप इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे, आणि आणखी किती बॉलिवूड-राजकीय लोकांची नावे समोर येतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे. प्रत्येक बॉलीवूड पार्टीत दिसणाऱ्या ओरीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये 5 जणांसोबत राहतो असं सांगत फिरतो.

सलीम शेख आहे तरी कोण?

सलीम शेख उर्फ लविश शेख किंवा मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख हा सध्या 252 कोटींच्या मेप्हेड्रोन (MD ड्रग्स) प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो फरार ड्रग किंगपिन सलीम डोलाचा  अत्यंत निकटवर्ती आणि प्रमुख सहकारी आहे. सलीम डोला हा स्वत: दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कमधील सदस्य आहे. सलीम शेखला ऑक्टोबर 2025 मध्ये दुबईहून भारतात प्रत्यार्पित (डिपोर्ट) करण्यात आलं. सध्य सलीम शेख मुंबई क्राइम ब्रांचच्या अँटी नारकोटिक्स सेलच्या ताब्यात आहे. मार्च 2024 मध्ये सांगलीतून 252 ते 256 कोटी किंमत असलेलं 126 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. याच प्रकरणाशी सलीम शेखचा संबंध आहे. हे नेटवर्क महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणापर्यंत पसरलेले आहे.

चौकशीत सलीम शेखने कबूल केले की, त्याने मुंबई आणि दुबईत हाय-प्रोफाइल ड्रग पार्टीज आयोजित केल्या होत्या आणि त्यात ड्रग्स सप्लाय केले. सलीम शेखने नाव घेतलेल्या सेलिब्रिटींचीही पोलीस आता चौकशी करत आहेत. हे सिलिब्रिटी फक्त पार्टीला उपस्थित होते की त्यांनी ड्रग्स घेतले हे तपासले जातं आहे. सलीम शेख स्वतःला दाऊदचा भाचा म्हणाला होता. मात्र ते खरं नाही. लक्झरी लाइफस्टाइल, महागड्या गाड्या (मर्सिडीज, बीएमडब्ल्यू) मधून सलीम शेख ड्रग्सची तस्करी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!