Homeदेश-विदेशपुणे जमीन गैरव्यवहारात 'अशी ही बनवाबनवी', अहवालाची खुद्द महसूलमंत्र्यांनाच नाही माहिती!

पुणे जमीन गैरव्यवहारात ‘अशी ही बनवाबनवी’, अहवालाची खुद्द महसूलमंत्र्यांनाच नाही माहिती!


पुणे जमीन व्यवहार: झी 24 तासनं भांडाफोड केलेला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुंठे समितीचा अहवाल समोर आलाय. मात्र या अहवालाची खुद्द महसूलमंत्र्यांनाच माहिती नाही. अहवाल आला आणि सादरही झाला, तरीही महसूलमंत्री म्हणतात की मुठे समितीची स्थापनाच केलेली नाही. चंद्रशेखर बावनकुळेंच्या या विधानानंतर आता चर्चांना उधाण आलंय. तर दुसरीकडे  या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारूंच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, पार्थ पवारांचं नाव नसल्यामुळे विरोधकांनी समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

झी २४ तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणात राजेंद्र मुठे समितीचा अहवाल समोर आलाय. या अहवालात शीतल तेजवानी दिग्विजय पाटलांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, दुसरीकडे या अहवालाबाबत राज्याच्या महसूल मंत्र्यांनी एक धक्कादायक विधान केलंय.

बावनकुळेसाहेब आता हा चौकशी अहवालात अगदी स्पष्ट भाषेत म्हटलंय..  महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक 6/11/2025 रोजीच्या आदेशान्वये राजेंद्र मुठेसह नोंदणी महानिरिक्षक तथा मुंद्रांक अधिक्षक मुख्यालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील समिती नेमण्यात आलीय. तरीही मंत्रीमहोदय बावनकळे म्हणतात.

मुद्रांक शुल्क विभागाकडून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात समिती नेमली जाते. त्याची माहिती महसूलमंत्र्यानाच नसते. त्यामुळे या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? अशी चर्चा आता सुरू झालीय.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर अंजली दमानियांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय.सरकारनं स्थापन केलेल्या समितीसंदर्भात मंत्र्यांनाच माहिती नसल्याचं त्या म्हणाल्यात. जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनियमितता बाहेर काढण्यासाठी सरकारनं राजेंद्र मुठेंची समिती नेमल्याचं दमानियांनी म्हटलंय.

मुठे समितीच्या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारूंचंच नाव आहे.. अहवालात पार्थ पवारांचं नाव का नाही? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय. मात्र, खरगे समितीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषी समोर येतील, त्यामुळे या प्रकरणात
कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा बावनकुळेंनी दिलाय.

समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं नावाचा उल्लेख नसल्यानं नाना पटोले यांनी थेट समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी त्यांनी केलीय, तर खरगे समितीच्या अवाहालानंतर नेमकं काय घडलं ते समोर येणार
अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय.

मुठे समितीच्या अहवाल आल्यानंतर त्यात पार्थ पवारांचं नाव नसल्यामुळे विरोधकांनी मुठे समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तर दुसरीकडे महसूल मंत्र्यांनाच मुद्रांक शुल्क विभागाकडून स्थापन केलेली समितीबद्दल माहिती नसल्यानं विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत..

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. मुठे समितीचा अहवाल काय सांगतो आणि त्यात कोणत्या नावांचा उल्लेख आहे?

उत्तर: झी २४ तासाने उघडकीस आणलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राजेंद्र मुठे समितीच्या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्या नावाचा उल्लेख आहे. अहवालात अनियमिततांचा तपशील आहे, पण पार्थ पवारांचे नाव मात्र यात समाविष्ट नाही, ज्यामुळे विरोधकांनी समितीवर शंका व्यक्त केली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना समितीबद्दल का माहिती नाही?

उत्तर: मुद्रांक शुल्क विभागाकडून पुणे महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्या ६ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशानुसार राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. मात्र, महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले की त्यांना समितीची स्थापनाच माहित नाही. यामुळे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली असून, विरोधक कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

विरोधकांनी मुठे समितीवर का प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे?

उत्तर: अहवालात पार्थ पवारांचे नाव नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाना पटोले यांनी समितीवर पक्षपाती असल्याचा आरोप केला असून, तुकाराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, खरगे समितीच्या अहवालानंतर नेमके काय घडले ते समोर येईल. अंजली दमानियांनीही मंत्र्यांना समितीबद्दल माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!