Homeमनोरंजनशुभमन गिल यांना उपचारानंतर कोलकाता रुग्णालयातून डिस्चार्ज

शुभमन गिल यांना उपचारानंतर कोलकाता रुग्णालयातून डिस्चार्ज


शुभमन गिल: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला गेला. यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेने टीम इंडियावर 30 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. साऊथ आफ्रिकेने हा ऐतिहासिक सामना 30 धावांनी जिंकत तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या भूमीत टेस्ट विजयाची नोंद केली. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाल्याने तो पहिल्या डावात रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर पडला होता. त्याला कोलकाताच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती सुद्धा समोर आली. त्यानंतर आता गिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

शुभमन गिलला अशी झाली दुखापत?

वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात टीम इंडियाची दुसरी विकेट पडल्यावर स्कोअर 75 धावांवर 2 विकेट असा होता. यावेळी कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने ३ बॉलचा सामना केला यात तो 4 धावा करू शकला. मात्र त्यानंतर तो रिटायर हर्ट होऊन बाहेर पडला. सायमन हार्मरविरुद्ध दोन चेंडूंचा बचाव केल्यानंतर, शुभमनने तिसऱ्या बॉलवर एक चौकार मारला, परंतु त्यानंतर त्याच्या मानेला दुखापत झाली. तेव्हा वेदनेने त्रस्त होऊन, शुभमन गिलने खेळ थांबवून मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सामन्यातूनच गिल बाहेर पडला.

हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज :

कर्णधार शुभमन गिल याला सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मान दुखीमुळे तो त्रस्त होता. मात्र काहीवेळापूर्वी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही माहिती समोर आलीये. तसेच गिल हॉस्पिटलमध्ये असताना बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली हे सुद्धा त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. कर्णधार शुभमन गिलला डिस्चार्ज मिळाला असला तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात तो खेळेल कि नाही याबाबत अजूनही शंका आहे.

हेही वाचा : तू निघून जा कारण की…. धोनी सोबतचं ‘ते’ संभाषण त्यानंतर जडेजाने CSK सोडण्याचा निर्णय घेतला

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

शुभमन गिलला कशी दुखापत झाली?
शुभमन गिलला मानेला दुखापत झाली जेव्हा तो सायमन हार्मरविरुद्ध बल्लेबाजी करत होता.

शुभमन गिलला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं का?
हो, शुभमन गिलला कोलकाताच्या वुडलंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार का?
अजूनही शंका आहे, त्याच्या मानेला दुखापत झाली आहे आणि त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!