Homeदेश-विदेशटॉयलेटमध्ये बाळ जन्माला आलेलं बाळ अचानक महिलेच्या पोटातून गायब होऊन कमोडमध्ये सापडलं.

टॉयलेटमध्ये बाळ जन्माला आलेलं बाळ अचानक महिलेच्या पोटातून गायब होऊन कमोडमध्ये सापडलं.

शौचालयात बाळाचा जन्म: बाळ होणे ही आईसाठी आयुष्यातील सर्वात सुखकर घटना असते. कारण बाळाची नाळ तिच्याशी जोडलेली असते. तिने बाळाला 9 महिने पोटात वाढवलेलं असतं. अशावेळी तिच्या नकळत बाळाची प्रसूती झाली असेल तर? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

छत्तीसगडच्या अंबिकापूर मेडिकल कॉलेज रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सूरजपूर जिल्ह्यातील प्रतापपूरची 30 वर्षीय रमापतीबाई सात महिन्यांची गर्भवती होती. 13 नोव्हेंबरला तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. यानंतर तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ एमसीएचला हलवण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ती वॉर्डातील शौचालयात गेली आणि तिथेच अचानक बाळाचा जन्म झाला. बाळ कमोडमध्ये अडकले, ज्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली.

महिला घाबरली

शौचालयातून परतल्यानंतर रमापतीबाईला पोटात बाळाची हालचाल जाणवली नाही. घाबरून तिने परिचारिकांना सांगितले. तपासणीत डॉक्टरांना कळले की प्रसूती झालीय आणि पोट रिकामे आहे. याबद्दल डॉक्टरांनी महिलेला विचारले असता मी काही वेळापूर्वी शौचास गेली होती, असे तिने सांगितले. यानंतर परिचारिकांनी ताबडतोब शौचालय तपासले. तेव्हा कमोडमध्ये त्यांना नवजात बाळ अडकलेले आढळले. ही बाब ऐकून कुटुंबीय आणि स्टाफ हैराण झाले.

कमोड तोडून बाळाची सुटका

परिचारिकांनी लगेच स्वच्छता पर्यवेक्षक आशिष यांना बोलावले. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आणि कमोड फोडून बाळाला बाहेर काढले. बाळ सात महिन्यांचे असल्याने कमकुवत होते. त्याला तात्काळ एसएनसीयूमध्ये हलवण्यात आले.

कशी आहे बाळाची प्रकृती?

बाळाला कमोडमधून बाहेर काढताना त्याचे शरीर निळे पडले होते आणि हृदयाचे ठोके अतिशय कमी होते. बालरोगतज्ञ डॉ. जे.के. रेलवानी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष देखरेख सुरू आहे. सध्या बाळाच्या स्थितीत काही सुधारणा दिसते पण पूर्ण बरे होण्यासाठी सतत उपचार आणि निरीक्षण आवश्यक आहे.वेळेवर मदत मिळाल्याने बाळ वाचण्याची शक्यता वाढलीय, असे डॉक्टरांनी सांगितले.

रुग्णालयाची जबाबदारी

या घटनेमुळे रुग्णालयातील देखभालीच्या कमतरतेचा प्रश्न समोर आलाय. गर्भवती महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाची गरज यातून अधोरेखीत होतेय. रमापतीबाई आणि तिचे कुटुंबीय तर या घटनेतून सावरु शकले नाहीत. पण बाळ सुखरूप असल्याने त्यांना थोडा दिलासा मिळालाय. रुग्णालय प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. प्रश्न: रमापतीबाईंना कधी आणि कुठे प्रसूतिवेदना सुरू झाल्या?

उत्तर: १३ नोव्हेंबरला सूरजपूर जिल्ह्यातील प्रतापपूर येथे ३० वर्षीय रमापतीबाईंना वेदना सुरू झाल्या. तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले, पण प्रकृती गंभीर असल्याने अंबिकापूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात (एमसीएच) हलवले.

२. प्रश्न: बाळ शौचालयाच्या कमोडमध्ये कसे अडकले आणि बाहेर कसे काढले?

उत्तर: शनिवारी सकाळी रमापतीबाई शौचालयात गेल्या तेव्हा अचानक बाळाचा जन्म झाला आणि ते कमोडमध्ये अडकले. परिचारिकांनी तपासणी केल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कमोड तोडून बाळाला सुरक्षित बाहेर काढले.

३. प्रश्न: नवजात बाळाची सध्याची प्रकृती काय आहे?

उत्तर: बाळ सात महिन्यांचे असल्याने कमोडमधून बाहेर काढताना निळे पडले होते आणि हृदयाचे ठोके कमी होते. आता एसएनसीयूमध्ये डॉ. जे.के. रेलवानी यांच्या देखरेखीखाली आहे; स्थितीत थोडी सुधारणा झाली असून, जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!