Homeमहाराष्ट्रअंजली दमानियांना घोटाळयांचे कागदपत्रं कोण देतं? दमानियांनी स्पष्टचं सांगितलं

अंजली दमानियांना घोटाळयांचे कागदपत्रं कोण देतं? दमानियांनी स्पष्टचं सांगितलं


अंजली दमानिया टू द पॉइंट मुलाखत: झी २४ तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टु द पॉइंट कार्यक्रमात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी अंजली दमानियांना त्यांना घोटाळ्याचे कागदपत्रे कोण देतं?? असं विचारताच त्यांनी सगळंच सांगितलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अंजली दमानियांनी पुढे म्हटलं की, पृथ्वीराज चव्हाणांना विचारा की सिंचन घोटाळ्याचे कागदपत्रे त्यांना पहिले कोणी दिले. माझी आणि त्यांची भेट रात्री 11 ते 2.30 वाजता झाली. तेव्हा माझ्यासोबत 15 माणसं होती. तेव्हा मी त्यांना माझ्यासमोर बसवून मी त्यांना पूर्ण सांगितलं होतं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी श्वेतपत्रिका काढली होती सिंचनाची.

मला जेव्हा गमंत वाटते की लोकं जेव्हा म्हणतात की तुम्हाला कागदपत्रे अमुक देत असेल तमुक देत असेल. मग तुम्ही त्याच्याविरोधात बोलत नाहीत. मला नेहमी लोकांना बोलावं वाटतं की मी एकटी आहे. मला जेवढ झेपतं तेव्हड मी करते. चार-पाच जणांविरुद्ध मी लढते. तुम्हीदेखील थोडी हिम्मत दाखवून लढा तरच देश बदलेल. मला दोनदा सिक्युरीटी दिली होती. मी लिहून दिलंय मला सिक्युरिटी नकोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, ‘आत्ताच्या घटकेला मी अमिरिकेत असताना मला फोन आला होता उच्चअधिकाऱ्यांचा, की आम्हाला अशा इनपुट आल्यात की यावेळेला तुमचा गेम करणार आहेत. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही गाड्या बदलून वापरा, तुम्ही गाडीत असताना फोन वापरु नका अन्यथा लोकेशन कळेल. पण इतकं असूनही आम्ही जीवावर उदार होऊन कशाची पर्वा न करता लढतोय तर लोकांनी बोलताना भान ठेवून बोलावं की आपण काय बोलतोय.’

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानियांची टू द पॉईंट मागणी

झी २४ तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिका-यांना पूर्ण कल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिका-यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमेडिया कंपनीनं जमीन व्यवहार मे महिन्यात केल्यानंतर जून महिन्यानंतर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियावर जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला होता. या संदर्भात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक पत्रही जिल्हाधिका-यांना लिहिलं होतं. त्यावर जिल्हाधिका-यांनी संबंधित प्रांत आणि तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्याचा दावाही दमानियांनी केलाय. जिल्हाधिका-यांनी जाणिवपूर्वक या प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप दमानियांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिका-यांना निलंबित करण्यात यावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!