IPL 2026 सर्व संघांची यादी जाहीर मराठी बातम्या: आयपीएल (IPL 2026) साठी प्रत्येक फ्रँचायझीकडे आपापली रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीत टीम्सना अधिकृत लिस्ट जाहीर करावीच लागणार आहे. दरम्यान, संजू सॅमसनपासून रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांच्या संभाव्य ट्रेडच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर चांगलाच तुफान माजले आहे. मुंबई इंडियन्सने तर शेरफान रदरफोर्ड आणि शार्दुल ठाकूर यांना अनुक्रमे गुजरात टायटन्स आणि LSGकडे ट्रेड करूनही टाकले आहे. मेगा ऑक्शनमध्ये 23.75 कोटींना विकला गेलेला वेंकटेश अय्यर, तसेच लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेवोन कॉनवे यांच्या रिलीजची चर्चा देखील तापली आहे. अशा परिस्थितीत कोणत्या टीमकडून कोणत्या खेळाडूंना IPL 2026 साठी रिलीज केले जाऊ शकते, याची संभाव्य यादी समोर आली आहे.
यावेळी खास गोष्ट म्हणजे प्रत्येक टीमला हवे तेवढे खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यामुळे रिलीज होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत फरक पडू शकतो. स्क्वाडची मर्यादा 18 ते 25 खेळाडू अशी असून टीमने खर्च केलेली एकूण रक्कम 120 कोटींपेक्षा जास्त नसावी.
हे ही वाचा: IPL 2026 Retentions: मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरची साथ सोडली! आता ‘या’ संघाकडून खेळणार सचिनचा लेक
सर्व टीम्सची संभाव्य रिलीज लिस्ट
चेन्नई सुपर किंग्स (CSK)
राहुल त्रिपाठी, विजय शंकर, डेव्हॉन कॉनवे, दीपक हुडा, श्रेयस गोपाल, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, शेख रशीद
गुजरात टायटन्स (GT)
जयंत यादव, दासून शनाका, करीम जन्नत, मानव सुथार, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रॉड
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, एनरिक नॉर्टजे, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, मनीष पांडे, चेतन साकारिया
हे ही वाचा: कोलकाता नाइट रायडर्समध्ये खळबळ! 24 कोटींचा स्टार खेळाडू रिलीज होण्याची शक्यता; ऑक्शनपूर्वी KKRचा मोठा निर्णय
मुंबई इंडियन्स (MI)
रीस टोपले, कर्ण शर्मा, लिझाड विल्यम्स, रघु शर्मा, सत्यनारायण राजू, लिझाड विल्यम्स
दिल्ली कॅपिटल्स (DC)
टी नटराजन, जेक फ्रेझर मॅकगर्क, हॅरी ब्रूक, डोनोवन फरेरा, दुष्मंथा चमीरा
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB)
लियाम लिव्हिंगस्टोन, रसिख सलाम, टिम सीफर्ट, स्वप्निल सिंह, अभिनंदन सिंह, मोहित राठी
सनरायझर्स हैदराबाद (SRH)
मोहम्मद शमी, अभिनव मनोहर, सचिन बेबी, राहुल चहर, वियान मुल्डर
राजस्थान रॉयल्स (RR)
शिमरॉन हातमायर, तुषार देशपांडे, नितीश राणा, कागेना माफाका, आकाश माफाका, नांद्रे बर्नांग, महिष तिक्शान, फजलह ते फोली
हे ही वाचा: Kuldeep Yadav: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट दरम्यान कुलदीप यादवने BCCI कडे पत्र लिहून मागितली रजा; कारण…
पंजाब किंग्स (PBKS)
ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, काइल जेमिसन, प्रवीण दुबे, हरनूर पन्नू
लखनौ सुपर जायंट्स (LSG)
शमर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी, मोहसीन खान, आर्यन जुयाल, मयंक यादव, मॅथ्यू ब्रेट्झके
























