मुंबई महानगरपालिका Bmc निवडणूक 2025 प्रभाग आरक्षण : मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान यानंतर आजी-माजी दिग्गज नगरसेवकांना मोठा फटका बसलाय.. पालिकेकडून काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतमध्ये
महिलांसाठी 50 टक्के म्हणजेच 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिला आरक्षणात जागा गमावलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण जागेवरुन निवडणूक लढवावी लागणार आहे.
महायुती आणि मविआतील अनेक दिग्गज नेत्यांच्या वॉर्ड आरक्षीत असल्यामुळे मोठा धक्का बसलाय. त्यामुळे मविआ आणि महायुती या वॉर्डमध्ये कोणत्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार. तसंच दिग्गज नेत्यांसाठी पक्ष नवीन कोणती उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईत कोणत्या दिग्गज नेत्यांचे वॉर्ड आरक्षित
माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका, वार्ड क्रमांक 1 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांचा वार्ड 108 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
कप्तान मलिक यांचा वॉर्ड क्रमांक 170 हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव
माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वार्ड क्रमांक 176 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक 182 हा ओबीसी वर्गासाठी राखीव
विशाखा राऊत यांचा वॉर्ड क्रमांक 191 यंदा ओबीसी महिला वर्गासाठी
राखीव
स्नेहल आंबेकर यांचा वार्ड क्रमांक 1998 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव यांना धक्का, यशवंत जाधव यांचा वार्ड क्रमांक 209 महिला ओपनसाठी आरक्षित
ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या कोणकोणत्या माजी नगरसेवकांना आरक्षण सोडतीचा फटका
तेजस्वी घोसाळकर -प्रभाग क्रमांक – 1
ओबीसी महिला आरक्षित
– सदा परब- प्रभाग क्रमांक – 88
सर्वसाधारण महिला आरक्षित
– हाजी मोहम्मद हलीम खान- प्रभाग क्रमांक 96
सर्वसाधारण महिला आरक्षित
– रमेश कोरगावकर -प्रभाग क्रमांक 114
सर्वसाधारण महिला आरक्षित
– सुरेश पाटील- प्रभाग क्रमांक 127
सर्वसाधारण महिला आरक्षित
मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक 182
ओबीसी आरक्षित
वसंत नकाशे – प्रभाग क्रमांक 186
sc महिला राखीव
आशिष चेंबूरकर – प्रभाग क्रमांक 196
सर्वसाधारण महिला आरक्षित
शिवसेनेला आरक्षण सोडतीचा फटका
चंद्रावती मोरे – प्रभाग क्रमांक 121
एसटी महिला राखीव
परमेश्वर कदम – प्रभाग क्रमांक १३३
sc महिला राखीव
अख्तर कुरेशी – प्रभाग क्रमांक 139
सर्वसाधारण महिला आरक्षित
मंगेश सातमकर- प्रभाग क्रमांक 175
सर्वसाधारण महिला आरक्षित
दत्ता नरवणकर – प्रभाग क्रमांक 197
सर्वसाधारण महिला आरक्षित
यशवंत जाधव -प्रभाग क्रमांक 209
सर्वसाधारण महिला आरक्षित
गीता सिंगण – प्रभाग क्रमांक 12
ओबीसी महिला आरक्षित
उपेंद्र सावंत- प्रभाग क्रमांक 118
sc महिला राखीव
संतोष खरात- प्रभाग क्रमांक 195
ओबीसी आरक्षित
भाजपला आरक्षण सोडतीचा फटका
मकरंद नार्वेकर – प्रभाग क्रमांक 227
सर्वसाधारण महिला आरक्षित
रवी राजा – प्रभाग क्रमांक 176
ओबीसी महिला आरक्षित
नील सोमय्या – प्रभाग क्रमांक 108
ओबीसी महिला आरक्षित
अभिजीत सामंत – प्रभाग क्रमांक 84
सर्वसाधारण महिला आरक्षित
अतुल शहा -प्रभाग क्रमांक 220
सर्वसाधारण महिला आरक्षित
ज्योती आळवणी – प्रभाग क्रमांक 85
ओबीसी आरक्षित





















