Homeदेश-विदेशव्हायरल व्हिडिओ पहा मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांना चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या...

व्हायरल व्हिडिओ पहा मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांना चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने अयोग्यरित्या स्पर्श केला.


व्हिडिओ मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम: जागतिक स्तरावर आजही महिला हक्कांचं उल्लंघन होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरच असल्याची घटना नुकतीच घडल्याचं समोर आलं. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातसुद्धा महिलांवर होणारे अत्याचार हा मुद्दा किती गंभीर आहे हेच व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून सिद्ध होत आहे. हा व्हिडीओ आहे जागतिक स्तरावरील राजकारणात महत्त्वाच्या हुद्द्यावरील महिला नेत्यासोबत झालेल्या हादरवणाऱ्या कृत्याचा.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मन विचलित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाऊडिया शीनबाम यांच्याशी कथित स्वरुपात एका मनसिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या पुरुषानं भर रस्त्यात गैरवर्तन आणि अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मेक्सिको सिटीतील ऐतिहासिक डाऊनटाऊन परिसरात ही घटना घडली असून, सोशल मीडियावरही त्या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे, तर अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित करून जात आहे.

राष्ट्रपती शीनबाम ज्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या समर्थकांसमवेत संवाद साधत होत्या त्याचवेळी नशेत असणारी एक व्यक्ती (पुरुष) त्यांच्या नजीक आली आणि त्यांनी शीनबाम यांना स्पर्श करत त्यांना Kiss करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्यांनं राष्ट्रपतींना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी तातडीनं त्यांचे अंगरक्षक पुढे आले आणि त्यांनी या व्यक्तीला दूर लोटलं.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये राष्ट्रपतींच्या जवळ येऊ पाहणारा पुरुष त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करताना दिसत आहे. सुरुवातीला सामान्य नागरिक काही संवाद साधण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळ येऊ पाहत आहे असाच भास त्यांच्या अंगरक्षकांना झाला. मात्र त्यानं त्यानं केलेलं कृत्य आणि ओलांडलेल्या सर्व मर्यादा पाहून अंगरक्षकही हादरले. किंबहुना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पाहिल्यानंतर शीनबाम यांनाही धक्काच बसला. मात्र त्यांनी क्षणात परिस्थिती सावरून नेली.

घडल्या प्रकारावर काय म्हणाल्या राष्ट्रपती?

BBC नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपला विनयभंग करण्याचा प्रकार यापूर्वीही घडला असून, त्यावेळी आपण राष्ट्रपती पदावर नव्हतो ही कटू आठवण शीनबान यांनी उजेडात आणली. सदर प्रकरणी रितसर तक्रार केली जाणार असून, हा अनुभव फक्त मला नाही तर माझ्या देशातील इतर महिलांनाही आल्याचं त्या म्हणाल्या. ‘आता तक्रार केली नाही, तर दुसऱ्या मेक्सिकन महिलांचं काय होणार? जर एका महिला राष्ट्रपतींशी (ते) असं वागू शकतात तर, देशातील इतर महिलांचं काय?’ असा बोचरा आणि या राक्षसी मानसिकतेवर घाला घालणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यामुळं पुन्हा एकदा महिला हक्क, त्यांची सुरक्षितता हे सर्व मुद्दे गांभीर्यानं चर्चेच येत असल्याचं पाहायला मिळत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!