Homeदेश-विदेशब्रेकिंग न्यूज बस स्टँड रेल्वे स्थानकातून भटके कुत्रे हटवा असे सर्वोच्च न्यायालयाने...

ब्रेकिंग न्यूज बस स्टँड रेल्वे स्थानकातून भटके कुत्रे हटवा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे


भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालय : भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अतिशय कठोर भूमिका घेत त्यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाच्या वतीनं 8 आठवड्यांची मुदत देत रेल्वे स्थानकं, रुग्णालयांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवलकून ताबडतोब भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावं अशा सक्त सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिलेल्या 8 आठवड्यांच्या मुदतीमध्ये शैक्षणिक संस्थांपासून रुग्णालयं, बस थांबे, रेल्वे स्थानकं या आणि तत्सम परिसरांतून भटके कुत्रे हटवून त्यांना ‘डॉग शेल्टर होम’मध्ये स्थलांतरित करण्याचेही आदेश दिले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भटक्या कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडावं, जिथून त्यांना आणण्याल आलं आहे या भूमिकेवर न्यायालय ठाम असल्याचं पाहायला मिळालं. सदर परिसर आणि तत्सम परिघातून भटक्या कुत्र्यांना दूर केल्यानंतर ते पुन्हा तिथे वावरताना दिसणार नाहीत याचीही काळजी घेण्याच्या सूचना न्यायालयानं देत 8 आठवड्यांच्या आत याबाबत कार्यवाही करावी असं सांगत त्यासंदर्भातीर कामकाज व्यवस्थित सुरू आहे की नाही हे सुनिश्चित करणअयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना न्यायालयानं केली आहे.

न्यायालयाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे…

  • शैक्षणिक संस्थानं, रुग्णालयं, बस थांबे, खेळाची मैदानं, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणहून बटक्या कुत्र्यांना हटवणं.
  • भटक्या कुत्र्यांना ‘डॉग शेल्टर होम’मध्ये पाठवणं
  • तातडीनं 8 आठवड्यांच्या आत याची अंमलबजावणी अपेक्षित
  • कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

अमायकस प्रस्तुत रिपोर्टला विचारात घेत या आदेश प्रक्रियेत त्याचाही समावेश करण्याची सूचना करत प्रत्येक राज्य, केंद्र शासित प्रदेशातील न्यायलयांच्या निर्देशांसह या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

राजस्थान न्यायालयाच्या निर्देशांचाही उल्लेख

सर्वोच्च न्यायालयाच्या माहितीनुसार राजस्थान उच्च न्यायालयानं जारी केलेल्या त्या निकालवजा आदेशांनाही विचाराधीन घ्यावं, ज्यामध्ये PWD नगरपालिका प्राधिकरण, रस्ते आणि परिवहन विभागानं महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवरून तत्सम प्राण्यांना हटवून त्यांना तातडीनं त्यांच्या मूळ स्थांनांवर पुनर्वसित करण्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार भटके कुत्रे आणि प्राण्यांबाबत माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकसुद्धा जारी करण्यात येणार असून, सर्व राज्यांचे मुख्य सचिव या सूचनांचं सक्तीनं पालन करणार असल्याची बाब न्यायालयानं अधोरेखित केली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काय करावे?
सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत अतिशय कठोर भूमिका घेत शैक्षणिक संस्थानं, रुग्णालयं, बस थांबे, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांना ‘डॉग शेल्टर होम’मध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांतील महत्त्वाचे मुद्दे?
शैक्षणिक संस्थानं, रुग्णालयं, बस थांबे, खेळाची मैदानं, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणहून भटक्या कुत्र्यांना हटवणं, भटक्या कुत्र्यांना ‘डॉग शेल्टर होम’मध्ये पाठवणं,तातडीनं 8 आठवड्यांच्या आत याची अंमलबजावणी अपेक्षित.

काय आहे राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशांबाबत?
राजस्थान उच्च न्यायालयानं जारी केलेल्या त्या निकालवजा आदेशांनाही विचाराधीन घ्यावं, ज्यामध्ये PWD नगरपालिका प्राधिकरण, रस्ते आणि परिवहन विभागानं महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवरून तत्सम प्राण्यांना हटवून त्यांना तातडीनं त्यांच्या मूळ स्थांनांवर पुनर्वसित करण्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!