Homeदेश-विदेशभारतातील प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसरचे निधन अनुनय सूद यांचे वय 32 व्या वर्षी...

भारतातील प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसरचे निधन अनुनय सूद यांचे वय 32 व्या वर्षी निधन पृष्ठावरील त्यांच्या मृत्यूची पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला


Anunay Sood dies at 32: दुबई येथील प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर अनुनय सूद याचे  निधन झाले आहे. 32 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर त्याच्या मृत्यू झाल्याची पोस्ट टाकण्यात ईली. त्याच्या पेडवर असलेली ही पोस्ट पाहून सगळेच हादरले. या आधी त्याती अनुनयची शेवटची पोस्ट लास वेगासमधून होती, जिथे ते स्पोर्ट्स कारमध्ये फिरताना दिसत होता.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अनुनयचे इंस्टाग्रामवर 1.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर शोक संदेश पोस्ट केला आहे. परंतु त्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. तीन वर्षांपासून तो फोर्ब्सच्या टॉप 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत होता. अनुनय सूद हा सोशल मीडिया ट्रॅव्हल सुपरस्टार होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक दुःखद पोस्ट शेअर करत त्याच्या निधनाची माहिती दिली.

कुटुंबाने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले आहे की आमच्या प्रिय अनुनय सूद याच्या निधनाची बातमी आम्ही खूप दुःखाने शेअर करत आहोत. या कठीण काळात आम्ही तुमच्या समजूतदारपणा आणि गोपनीयतेची विनंती करतो. कृपया घराबाहेर गर्दी करु नका. कृपया अनुनयच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी प्रार्थना करा. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” या संदेशाने लाखो अनुयायांच्या हृदयाला स्पर्श केला. अनुनयच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी असेही म्हटले की त्यांना या दुःखातून एकटेच जायचे आहे.

कोण आहेत अनुनय सुद?

अनुनय सूद हा प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर आहे.  त्याचे इंस्टाग्रामवर 1.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर 3,80,000 सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या रील्स, व्हीलॉग्स आणि ट्रॅव्हल फोटोंनी लाखो लोकांना जग प्रवास करण्यास प्रेरित केले. 2022, 2023 आणि 2024 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत त्याचा समावेश होता. फोर्ब्सच्या बायोमध्ये असे लिहिले आहे की अनुनय प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर तो एक मार्केटिंग फर्म देखील चालवत होताय 3 नोव्हेंबर रोजी युट्यूबवर त्याचा शेवटचा व्हिडिओ अपलोड केला. त्याच्या मृत्यू कसा झाला याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1 अनुनय सूद यांचे निधन कधी आणि कुठे झाले?
अनुनय सूद यांचे दुबई येथे ३२ व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही दुःखद बातमी शेअर केली. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

2 अनुनय सुद कोण आहेत?
अनुनय सूद हे प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आणि फोटोग्राफर होते. ते एक मार्केटिंग फर्म देखील चालवत होते. त्यांच्या रील्स, व्हीलॉग्स आणि ट्रॅव्हल फोटोंनी लाखो लोकांना जग प्रवास करण्यास प्रेरित केले.

3 अनुनय सूद यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती होते?
त्यांचे इंस्टाग्रामवर १.४ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स होते, तर युट्यूबवर ३,८०,००० सबस्क्राइबर्स होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!