Homeदेश-विदेशहिंदुजा चेन्स ग्रुपन हिंदुजा पॅनसे आणि ८५

हिंदुजा चेन्स ग्रुपन हिंदुजा पॅनसे आणि ८५


गोपीचंद हिंदुजा यांचे निधन: भारतीय-ब्रिटिश अब्जाधीश आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद परमानंद हिंदुजा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रमी रेंजर यांनी ही माहिती दिली आहे. वरिष्ठ सभागृह असणारं ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रेंजर यांनी एक निवेदन जारी करत शोक व्यक्त केला आहे. हिंदुजा हे “सर्वात प्रेमळ, नम्र आणि निष्ठावंत मित्रांपैकी एक” होते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे असं भारतीय वंशाचे खासदार म्हणाले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

“प्रिय मित्रांनो, जड अंतःकरणाने, मी तुमच्यासोबत आमचे प्रिय मित्र श्री. जी.पी. हिंदुजा यांचं दुःखद निधन झाल्याची माहिती शेअर करत आहे. ते स्वर्गीय निवासासाठी निघून गेले. ते सर्वात दयाळू, नम्र आणि निष्ठावंत मित्रांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे, कारण ते खरोखरच समुदायाचे हितचिंतक आणि मार्गदर्शक होते,” असं रेंजर यांनी निवेदनात म्हटलं आहे.

“मला त्यांना अनेक वर्षांपासून जाणून घेण्याचा सौभाग्य मिळाल. त्यांच्यातील गुण अद्वितीय होते, उत्तम सेन्स ऑफ ह्युमर, समुदाय आणि भारत यांच्याप्रती वचनबद्धता आणि त्यांनी नेहमीच चांगल्या कामांना पाठिंबा दिला. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढणं कठीण होईल. त्यांना स्वर्गात शांती लाभो. ओम शांती,” असं सांगत त्यांनी निवेदनाचा शेवट केला आहे.

गोपीचंद हिंदुजा कोण होते?

युके संडे टाईम्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, जीपी हिंदुजा हे सलग सात वर्षे युनायटेड किंग्डममधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 1940 मध्ये त्यांचा भारतात जन्म झाला. त्यांनी हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेडचे ​​अध्यक्ष म्हणूनही काम केलं आणि 2023 मध्ये त्यांचे बंधू श्रीचंद हिंदुजा यांचे डिमेंशियामुळे निधन झाल्यानंतर त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारलं.

गोपीचंद हिंदुजा यांनी 1959 मध्ये मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टरेट ऑफ लॉ पदवी देखील मिळाली. लंडनच्या रिचमंड कॉलेजने त्यांना अर्थशास्त्राची मानद डॉक्टरेट देखील दिली.

हिंदुजा कुटुंबाचा व्यवसाय सुरुवातीला 1914 मध्ये जीपी हिंदुजा यांचे वडील परमानंद हिंदुजा यांनी सुरू केला होता. गोपीचंद हिंदुजा आणि त्यांचे बंधू श्रीचंद हिंदुजा यांनी हा व्यवसाय हाती घेतला, जो प्रामुख्याने एक व्यापारी कंपनी होती आणि त्याचे रूपांतर आताच्या अब्जावधी डॉलर्सच्या समूहात केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!