Homeदेश-विदेशViral Video: Kerala Father Uses QR Code for Wedding Gift! Guests Give...

Viral Video: Kerala Father Uses QR Code for Wedding Gift! Guests Give Digital Shagun Instead of Cash | लग्नात पैशांचा आहेर घेण्यासाठी भन्नाट आयडिया! वधूच्या वडिलांनी शर्टवरचं लावला QR कोड, Video Viral


केरळ लग्नाचा व्हायरल व्हिडिओ: भारतातील लग्न समारंभ नेहमीच काहीतरी हटके असतात. रंगीबेरंगी कपडे, पारंपरिक विधी, आणि शगुनाच्या लिफाफ्यांशिवाय तर लग्न अपूर्णच वाटतं. पण आता ‘डिजिटल इंडिया”च्या युगात या परंपरांमध्येही आधुनिकतेचा स्पर्श दिसू लागला आहे. केरळमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात शगुन घेण्याचा असा अनोखा मार्ग निवडला, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या शर्टच्या खिशावर थेट पेटीएमचा QR कोड लावला.  जेणेकरून पाहुणे रोख पैसे किंवा पाकिटं देण्याऐवजी मोबाइल स्कॅन करून डिजिटल शगुन देऊ शकतील.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

झिरो पेपर वेस्टचे उत्तम उदाहरण

या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, “डिजिटल इंडिया वेडिंग एडिशन सुरू झालं!” तर दुसऱ्याने मजेत लिहिलं, “आता नाही कॅश, फक्त स्कॅन आणि संस्कार!” अनेकांनी या कल्पनेचं कौतुक करत ती पर्यावरणपूरक आणि व्यवहार्य असल्याचं म्हटलं. यामुळे रोख पैशाची चिंता संपलीच, पण लिफाफ्यांचा पेपर वेस्टही टळला. केरळसारख्या 100% साक्षर राज्यात हा उपक्रम ‘Zero Paper Waste Wedding’चं उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे. व्हिडिओमध्ये सुंदर सजावट, आनंदी वातावरण आणि हसरे पाहुणे दिसतात. कॅमेरा जसाच वधूच्या वडिलांकडे वळतो, त्यांच्या शर्टवरचा QR कोड सर्वांचं लक्ष वेधतो. पाहुणे एकामागून एक आपले फोन काढतात, कोड स्कॅन करतात आणि थेट ट्रान्सफर करतात. काही सेकंदातच डिजिटल शगुन पूर्ण! या क्लिपला हजारो व्ह्यूज मिळाले असून, ती X (माजी ट्विटर) आणि Instagram वर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

काही यूजर्सनी केली टीका

जरी अनेकांनी या आयडियाचं स्वागत केलं असलं तरी काहींनी यावर नाराजीही व्यक्त केली. एका यूजरने लिहिलं, “लग्नासारख्या पवित्र प्रसंगी डिजिटल ट्रान्सॅक्शन? थोडं विचित्र वाटतं.” तर दुसऱ्याने म्हटलं, “ही तर भीक मागण्याची नवी पातळी आहे!” मात्र बहुतांश लोकांनी हे टाइमच्या बरोबरीने चालणारे पाऊल असल्याचं सांगितलं.

चर्चा फक्त हशाची नाही, विचारांचीही

हा प्रसंग केवळ मजेशीर नाही तर विचार करायला लावणारा आहे. पुढच्या काही वर्षांत भारतातील लग्नं पूर्णपणे cashless होतील का? केवळ डिजिटल शगुन आणि ऑनलाइन गिफ्ट कार्ड्सचं युग येणार का? केरळमधील या लग्नाने नक्कीच या चर्चेला सुरुवात करून दिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!