Homeदेश-विदेशदहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर


नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अशात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तारख्यांबद्दल चिंता पडली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 0 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत. आता सीबीएसई (CBSE) बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्या घरात सीबीएसई (CBSE) बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी या तारखा नोंद करुन घ्या. नवीन वर्षात 17 फेब्रुवारी 2026 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. आता विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी साडेतीन महिने असणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेचं वेळापत्रकाची माहिती मिळणार आहे. शिवाय हे वेळापत्रक विद्यार्थी किंवा पालक डाऊनलोडही करु शकतात. बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई 10 वी परीक्षा यंदा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 मध्ये असणार आहे. तर, सीबीएसई 12 वी परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. विषयानुसार परीक्षेसाठी नियोजित तारखेच्या दिवशी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत पेपर असणार आहे. यावर्षी सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 204 विषयांसाठी भारत आणि जगभरातील 26 देशांतून सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी 45 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा कधीपासून?

महाराष्ट्र स्टेट बोर्डानेही परीक्षेच्या तारखा जाहीर केला असून 12 बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026  पर्यंत असणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण, 12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १: सीबीएसई बोर्डाच्या १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा कशा आहेत?
उत्तर: सीबीएसई १०वी परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ पर्यंत होईल. तर १२वी परीक्षा १७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२६ पर्यंत असेल. परीक्षेची सुरुवात नवीन वर्षात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल.

प्रश्न २: सीबीएसई परीक्षेचे वेळापत्रक कुठे मिळेल?
उत्तर: सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विषयानुसार वेळापत्रक उपलब्ध आहे. विद्यार्थी किंवा पालक हे डाउनलोड करू शकतात.

प्रश्न ३: सीबीएसई परीक्षेचे वेळा काय आहेत?
उत्तर: परीक्षेच्या नियोजित तारखेच्या दिवशी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत आणि दुपारी १:३० वाजेपर्यंत पेपर असतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!