Homeदेश-विदेशमुक्यामंत्री महिला रोजगर योजनेसाठी उधव ठाकरे शिवसेना स्लेव्ह्स पंतप्रधान मोदी

मुक्यामंत्री महिला रोजगर योजनेसाठी उधव ठाकरे शिवसेना स्लेव्ह्स पंतप्रधान मोदी


मुखियंत्री माहिला रोजगर योजना: “भारताचा निवडणूक आयोग म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे. संविधानिक पदांवर बसून निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश हे भाजपची चाकरी बजावत आहेत. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा याबाबतचा मुखवटा नुकताच फाडण्यात आला आहे. भाजपच्या ‘शाखा’ म्हणून या संविधानिक संस्था काम करत असतील तर देशातील निवडणुका हा केवळ एक फार्स ठरतो. बिहारातील विधानसभा निवडणूक भाजप-नितीश कुमार यांच्या युतीला आधी सहजसोपी वाटत होती. हरयाणा, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मते चोरी करून किंवा मते विकत घेऊन निवडणूक जिंकण्याचे त्यांचे मनसुबे राहुल गांधी यांनी धुळीस मिळवले. त्यामुळे सरकारी तिजोरीचा वापर करून मते विकत घेण्याची योजना पंतप्रधान मोदी यांनी आखली आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

पैशांच्या अमलाखाली मतदान करण्यासाठी मोदी उत्तेजन देत आहेत

“बिहारातील 75 लाख महिलांच्या खात्यांत मोदी यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले व त्यासाठी बिहारच्या तिजोरीत एका तासात 7,500 कोटींचा निधी वळविण्यात आला. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’च्या नावाखाली हा निधी देणे म्हणजे भाजपला मते देण्यासाठी दिलेली लाच आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या कररूपी पैशांतून दिलेली ही लाच म्हणजे आर्थिक अपराध आहे. या पैशांतून महिलांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी सहाय्य मिळेल, अशी विशेष माहिती देण्यात आली. या योजनेंतर्गत एक कोटी 11 लाख महिलांचे अर्ज आले व त्यातील 75 लाख महिलांना हे पैसे मंजूर केले. बिहारात पुढील दोन महिन्यांत निवडणुका होतील. तशी घोषणा होण्याच्या काही दिवस आधी ‘ही’ लाचखोरी मते विकत घेण्यासाठी झाली. भारतीय मतदारांना पैशांच्या अमलाखाली मतदान करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी उत्तेजन देत आहेत. याची दखल सगळ्यात आधी निवडणूक आयोगाने घ्यायला हवी होती,” अशी अपेक्षा ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

आत्मनिर्भरतेची प्रवचने देतात, पण मतदारांना…

“सामुदायिक हत्याकांड व्हावे तसे हे सामुदायिक लाच (Mass Bribery) प्रकरण आहे. निवडणुकीतील पारदर्शीपणा, निष्पक्षपणावरच त्यामुळे संशयाचे ढग निर्माण झाले. भारतीय मतदारांना विकत घेऊन लोकशाहीवर ताबा मिळवण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मूक संमतीने हे घडत आहे. भाजपची सत्ता प्रस्थापित झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सरकारी लाच देण्याचे प्रमाण वाढले आहे. पंतप्रधान मोदी हे देशाला दिलेली अनेक आश्वासने पाळायला तयार नाहीत. ते जनतेला आत्मनिर्भरतेची प्रवचने देतात, पण मतदारांना आत्मनिर्भर करण्याऐवजी दुर्बल व पंगू बनवताना दिसतात,” असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

कोणता उद्योग व रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते?

“बिहारातील महिलांची मते विकत घेण्याचे ताजे प्रकरण त्याच प्रकारात मोडते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीआधी अशाच पद्धतीची ‘लाडकी बहीण’ योजना या मंडळींनी सुरू केली व महिलांच्या खात्यांवर प्रत्येकी 1500 रुपये जमा करून मते विकत घेतली. या योजनेमुळे महाराष्ट्राचे आर्थिक गणित जास्तच कोलमडले व मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला राज्याच्या तिजोरीत दमड्याही उरल्या नाहीत. महिन्याला आम्ही 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देतो असे राज्याचे अर्थमंत्री रोज सांगतात, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीविषयी ते बोलत नाहीत. बिहारातही आता तोच खेळखंडोबा सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोदींनी 75 लाख महिलांच्या खात्यांत प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. 10 हजार रुपयांत ग्रामीण भागात असा कोणता उद्योग व रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

भारतीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांना झापडे बांधल्याचा

“बिहारातील साधारण एक कोटी महिलांनी भाजपला मतदान करावे यासाठीच ही योजना आणली. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा एक पैसा अद्यापि मिळालेला नाही आणि बिहारात निवडणुका नजरेसमोर ठेवून महिलांना मोदी भ्रष्टाचार योजनेतून 10 हजार रुपये मिळाले आहेत. ही सरकारी तिजोरीची लूट आहे. पंतप्रधानांचा हा व्यवहार आर्थिक गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. बिहारातील ही योजना दुसरे तिसरे काही नसून ‘मतदार लाच योजना’च आहे. भारतीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांना झापडे बांधल्याचा परिणाम भारताला भोगावा लागत आहे. मतदार लाच योजनेचा प्रत्येक भारतीयाने धिक्कार करायला हवा. हे जरा अतिच सुरू आहे!” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!