Homeदेश-विदेशनेपाळ मोगल एम्पायर नेपाळ इतिहासावर मोगल का अपयशी ठरले हे आपणास माहित...

नेपाळ मोगल एम्पायर नेपाळ इतिहासावर मोगल का अपयशी ठरले हे आपणास माहित आहे काय?


नेपाळ इतिहास: राजकीय अस्थिरता, देशातील युवा वर्गाकडून सातत्यानं होणारी आंदोलनं आणि या आंदोलनांना मिळालेल्या हिंसक वळणानंतर आता कुठे नेपाळमधील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. देशात बेरोजगारी वाढत असून नागरिक आणि लष्करामध्ये समन्वय साधणारं सरकार सत्तेत असावं या मागणीसद देशातून राजेशाहीनं माघार घ्यावी ही मागणी नेपाळमध्ये मागील काही दिवसांमध्ये जोर धरताना दिसली. असा हा देश एकाएकी जागतिक पटलावर चर्चेचा विषय ठरला.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

भूतकाळात डोकावताना…

नेपाळच्या भूतकाळात डोकावलं असता त्याचा रक्तरंजित इतिहासही हादरवून सोडतो. अशा या देशाच्या बाबतीच एक गोष्ट मात्र अतिशय अनपेक्षित. ती म्हणजे 300 वर्षांहून अधिक काळासाठी भारतासारख्या विशाल भूमीवर राज्य करणाऱ्या मुघलांना कधीच नेपाळची भूमी पूर्णपणे अधिपत्याखाली आणता आली नाही.

मुघलांना का जिंकता आलं नाही नेपाळ?

16व्या ते 18व्या शतकापर्यंत भारतीय उपमहाद्वीपावर मुघलांचं वर्चस्व होतं. बाबरपासून औरंगजेबापर्यंत मुघल शासकांचा प्रभाव बंगाल, पंजाब, दख्खन आणि अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पाहायला मिळाला. तरीही नेपाळ त्यांच्या आटोक्यात येत नव्हतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं नेपाळची भौगोलिक स्थिती.

उंचच उंच पर्वतरांगा, खोर आणि तितकीच जीवघेणी दरीखोरी, घनदाट वनराई यांमुळं नेपाळला नैसर्गिकरित्या एक सुरक्षा कवच लाभलं होतं. अतिप्रचंड मोठ्या तोफा आणि घोडदळावर अवलंबून असणारी मुघल सेना या पर्वतीय क्षेत्रात मात्र युद्धात कमकुवत पडत होती.

मुघलांचं प्राधान्य आणि लक्ष दुसरीकडेच…

मुघलांनी सर्वाधिक प्राधान्य बहुतांशी मैदानी आणि सुपिक क्षेत्रांना देत तिथं आक्रमणं केली. गंगा आणि यमुनेचं खोरं, त्यानजीकचा परिसर, बंगाल आणि गुजरात अशी ठिकाणं त्यांच्यासाठी व्यापारवृद्धी आणि आर्थिक सुबत्तेचे स्त्रोत होते. त्या तुलनेत नेपाळमध्ये पिकांचं मर्यादित प्रमाण आणि आव्हानात्मक भौगोलिक रचना त्यांच्यासाठी या भागाला कमी प्राधान्य देण्याच्या कारणांमध्ये भर पाडत होती.

मुघलकालीन वर्षांमध्ये नेपाळ अनेक लहान भागांमध्ये विभागला होता. ज्यामध्ये काठमांडू, भक्तपूर, ललितपूर यांचा समावेश होता. या राज्यांमध्ये परस्पर विरोध असला तरीही बाह्य आक्रमणांच्या वेळी मात्र ते एकजुटीनं प्रतिकार करण्यास सक्षम होते आणि याच एकीनं त्यांना मुघलांविरोधात लढण्याचं बळ दिलं. त्यातच नेपाळ हा भारत आणि तिबेटदरम्यानचा व्यापारी सेतू होता. जिथून लोकर, मीठ, मसाले, धातू अशा वस्तूंची देवाणघेवाण केली जात होती. ज्या कारणास्तव मुघलांनी नेपाळशी संघर्षाऐवजी व्यापारी संबंध टिकवण्यावर भर दिला.

लष्करी आव्हानं…

नेपाळमधील गुरखा योद्धे पर्वतीय युद्धशैलीमध्ये निपुण होते. त्या तुलनेत मुघल सैन्याकडे मैदानी लढायांचा अनुभव होता. ज्या कारणास्तव त्यांना पर्वतांमध्ये सातत्यानं अपयशाचा सामना करावा लागत होता. ज्या कारणामुळं नेपाळवर मुघलांनी चढाई करण्याचा पर्याय पाहिला नाही. उत्तर पश्चिमेकडून असणारा अफगाण आणि ईराण्यांचा धोका, दक्षिणेत सुरू असणारा मराठ्यांसोबतचा संघर्ष आणि पूर्वेत आसाम बंगालमधील आव्हानांमध्ये मुघलांना बराच फौजफाटा तैनात करावा लागत असल्यानं त्यांनी नेपाळकडे दृष्टीक्षेपही कमीच टाकला आणि या भूमीवर त्यांना अधिपत्य मिळवता आलं नाही.

FAQ

नेपाळमध्ये सध्या काय राजकीय संकट आहे?
2025 मध्ये Gen-Z तरुणांच्या आंदोलनाने भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवरून हिंसा भडकावली. पंतप्रधान ओलींनी राजीनामा दिला, 30 हून अधिक मृत्यू झाले, आणि लष्कराने नियंत्रण घेतलं. आंदोलक अंतरिम सरकारची मागणी करत आहेत.

मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?
मुख्य कारणं भौगोलिक कठीणता (हिमालय), आर्थिक फायदा नसणे, व्यापारी मार्ग टिकवणे आणि गुरखा योद्ध्यांची शक्ती. मुघल मैदानी प्रदेशांना प्राधान्य देत.

नेपाळमध्ये गुरखा योद्ध्यांची भूमिका काय होती?
गुरखा पर्वतीय युद्धशैलीत निपुण होते. मुघल आणि ब्रिटिशांना त्यांचा पराभव करणं कठीण गेलं, ज्यामुळे नेपाळ स्वतंत्र राहिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!