Homeमनोरंजनडॅनिश फार्मास्युटिकल कंपनी नोव्हो नॉर्डिस्क यांनी भारतात वजन कमी करणारे औषध वेगोवी

डॅनिश फार्मास्युटिकल कंपनी नोव्हो नॉर्डिस्क यांनी भारतात वजन कमी करणारे औषध वेगोवी

मनोरंजन (आरोग्य) : वजन कमी करणारे औषध: सध्याच्या काळात लठ्ठपणा ही फार मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणासोबत डायबेटिजसह तसंच ह्रदयाशी संबंधित अनेक आजारही बळावतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लोकांची हीच समस्या लक्षात घेत डेन्मार्कमधील औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने (Novo Nordisk) मंगळवारी भारतात वजन कमी करणारं औषध लाँच केलं आहे. या औषधाचं नाव वेगोवी (Wegovy) आहे, जे एक इंजेक्टेबल सेमाग्लुटाइड आहे.

वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे औषध

आठवड्यातून एकदा घेतलं जाणारं ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट (GLP-1 RA) वेगोवी हे भारतातील पहिले आणि एकमेव वजनावरील औषध आहे जे दीर्घकाळासाठी वजनाचं व्यवस्थापन करतं आणि मेजर एडवर्स कार्डियोवास्कुलर इवेंट्सचा (MACE) धोका कमी करतं. हे पेनसारखं उपकरण आहे जे वापरण्यास सोपं आहे. ते 0.25 मिलीग्राम, 0.5 मिलीग्राम, 1 मिलीग्राम, 1.7 मिलीग्राम आणि 2.4 मिलीग्राम अशा वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे.

किंमत किती?

0.25 मिलीग्राम, 0.5 मिलीग्राम आणि 1 मिलीग्रामसाठी औषधाची किंमत 17,345 रुपयांपासून सुरू होते, तर 1.7 मिलीग्रामची किंमत 24,280 रुपये प्रति पेन आणि 2.4 मिलीग्रामची किंमत 26,015 रुपये प्रति पेन आहे. हे केवळ प्रिस्क्रिप्शनवर मिळणारं औषध असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. म्हणजे हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे. वेगोवी लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा देऊ शकतं.

कशाप्रकारे काम करतं औषध?

INDIAB च्या एका अभ्यासानुसार, जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सामान्य लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्या 254 मिलियन आहे, तर 351 मिलियन लोक पोटाच्या लठ्ठपणाने ग्रस्त आहेत.

वेगोवी एक GLP-1 रिसेप्टर एका प्रकारचं प्रथिन आहे. ज्यामुळे भूक कमी लागते आणि खाण्याची इच्छा कमी होते. ज्यामुळे त्याचा वजनावर प्रभाव दिसू लागतो. ते इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता देखील सुधारते, ज्यामुळे कार्डिओमेटाबॉलिक प्रणाली सुधारते.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान:विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

0
पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला...
spot_img

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
error: Content is protected !!