Homeमनोरंजनदेसी की पांढरे अंडे, कोणते आरोग्यदायी आहे? काय सांगतात पोषणतज्ज्ञ?

देसी की पांढरे अंडे, कोणते आरोग्यदायी आहे? काय सांगतात पोषणतज्ज्ञ?

मनोरंजन (आरोग्य) : देसी अंडी वि व्हाइट अंडी: ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, हे तर आपण लहानपणापासून ऐक आलो आहोत. आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर आपल्याला अंडी खायला सांगतात. लहान मुलं असो किंवा प्रौढ अंडे सर्वांसाठी आरोग्यसाठी फायदेशीर मानले गेले आहे. अंडी ही पौष्टिक आणि किफायतशीर अन्न असल्याने ते सर्वांना आवडतं. अंड्यातून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्कृष्ट स्रोत आपल्याला मिळतो. जीममध्ये व्यायाम करणारी, खेळात सक्रीय असणारी लोक अंड खाण्यावर जास्त भर देतात. पण देसी (तपकिरी) की पांढरे अंडे नेमकं आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, याबद्दल आजही अनेकांच्या मनात गोंधळ आहे. तुम्हालाही हीच समस्या असेल तर पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी पोषण आणि दोन्हीचे फायदे याबद्दल सांगितलं आहे.

सर्वात प्रथम अंड्याचे रंगाबद्दल जाणून घेऊयात. देशी अंडी भारतीय किंवा स्थानिक कोंबड्यांच्या जातींपासून येतात. जसे की देसी बंकर कोंबडी. ही अंडी हलक्या तपकिरी किंवा तपकिरी रंगाची देतात. दुसरीकडे, पांढरी अंडी सहसा थर जातीच्या (जसे की व्हाईट लेगहॉर्न) कोंबड्यांपासून येतात. अंड्याचा रंग केवळ कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो, पोषणावर नसतो हे विशेष जाऊन घ्या.

दोन्ही अंड्यांमधील पोषणात नेमका काय फरक आहे?

देशी अंड्यांमध्ये सामान्यतः थोडे जास्त पोषक घटक असून देशी कोंबड्या खुल्या वातावरणात राहतात आणि नैसर्गिक आहार (कीटक, बिया, हिरवी पाने इ.) खातात. त्यामुळे त्यांच्या अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन जास्त असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे. तर पांढरी अंडी सामान्यतः पोल्ट्री फार्ममध्ये वाढवलेल्या कोंबड्यांपासून मिळतात. जिथे त्यांना संतुलित आणि नियंत्रित आहार दिला जातो. ही अंडी स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध असतात. कोंबड्यांना पौष्टिक आहार मिळाल्यास त्यांचे पोषण भारतीय अंड्यांसारखेच दिसतातय. जरी सहसा त्यांचे पोषण थोडे कमी असतं. पांढऱ्या अंड्यांचे कवच पातळ असते, ज्यामुळे ते तोडणे सोपे असतं.

स्वाद कोणाचा चांगला?

देशी अंड्यांचा स्वाद थोडासा घट्ट आणि जाड असतो. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, देशी अंडी जास्त ‘तृप्त’ असतात. दुसरीकडे, पांढरी अंडी हलकी आणि सहज पचणारी असतात, म्हणून मुलं आणि वृद्धांना ती खाण्याचा सल्ला दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे देशी अंडी पांढऱ्या अंड्यांपेक्षा महाग असतात कारण देशी कोंबड्या वाढवण्यासाठी जास्त वेळ आणि पैसा लागतो. पांढरी अंडी सर्वत्र सहज उपलब्ध असतात आणि बजेटला अनुकूल मिळतात.

आरोग्यासाठी काय फायदेशीर?

जर तुम्ही अधिक पोषण, नैसर्गिक स्रोत आणि निरोगी चरबी शोधत असाल तर देशी अंडी थोडी जास्त फायदेशीर आहेत. पण जर तुम्हाला बजेट आणि सहज पचण्याजोगा पर्याय हवा असेल तर पांढरी अंडी देखील एक चांगला पर्याय आहे. दोन्हीही त्यांच्या स्वतःच्या पातळीवर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तुम्हाला फक्त संतुलन आणि गरजेनुसार निवड करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. शिवतेज न्यूज याची खातरजमा करत नाही.)

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी 'रामरक्षा...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...
spot_img

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...
error: Content is protected !!