करिश्मा कपूर माजी नवरा सुनजय कपूर यांचे निधन झाले: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती आणि उद्योगपती संजय कपूरचे निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये घडली. संजय कपूर तिथे पोलो खेळत होते. खेळादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.
संजय कपूर यांचे अचानक निधन
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे लग्न 2003 साली झाले होते. जवळपास 13 वर्षांनी, 2016 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2017 साली संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी दुसरे लग्न केले. गेल्या आठ वर्षांपासून ते दोघं एकत्र सुखाने संसार करत होते. मात्र, 12 जून 2025 च्या रात्री संजय कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी संजय कपूर यांच्या मृत्यूची पुष्टी केली. एक्सवरील एका पोस्ट लिहत ही माहिती दिली आणि त्यांचे दुःख व्यक्त केले.
निधन झाल्यावर मनापासून दु: खी @Sunjaykapur : आज इंग्लंडमध्ये त्याचे निधन झाले: एक भयानक नुकसान आणि त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या सहका to ्यांबद्दल मनापासून शोक @sonacomstar … शांती बद्दल
– सुहेल सेठ (@सुशेल्सेथ) 12 जून, 2025
‘ती’ पोस्ट ठरली शेवटची
संजय कपूर यांनी निधनाच्या दिवशी म्हणजेच 12 जूनला शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यांनी अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघातावर शोक व्यक्त केला होता.
अहमदाबादमधील शोकांतिकेच्या एअर इंडियाच्या दुर्घटनेची भयंकर बातमी. माझे विचार आणि प्रार्थना सर्व कुटुंबांसह आहेत. या कठीण तासात त्यांना सामर्थ्य मिळू शकेल. #प्लॅनक्रॅश
– सनजय कपूर (@सुंजैकापूर) 12 जून, 2025
कुटुंबात कोण आहे?
संजय कपूच्या मागे त्यांची पत्नी प्रिया आणि मुलगा आजारियस आहे. प्रिया सचदेव आणि संजय कपूर यांना अजारियस नावाचा एक मुलगा आहे, ज्याचा जन्म 2018 साली झाला होता. सध्या तो सात वर्षांचा आहे. संजय कपूर यांच्या अचानक जाण्याने छोटा अजारियस आणि प्रिया दोघेही हादरले आहेत.






























