Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे राजकारण स्पष्ट केले की नितेश राणे यांनी बाॅपचे मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस...

महाराष्ट्राचे राजकारण स्पष्ट केले की नितेश राणे यांनी बाॅपचे मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस नारायण राणे यांनीही विरोध केला


नितेश राणे यांनी आपली बीएएपी टिप्पणी काय म्हटले ते स्पष्ट केले: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ‘बाप काढण्यावरुन’ वादाला तोंड फुटलं आहे. महायुतीमधील मित्र पक्षांवरच भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद कॅबिनेटच्या बैठकीमध्येही उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच स्वत: स्फोटक विधानांमुळे चर्चेत असलेले नितेश राणेंचे वडील खासदार नारायण राणेंनीही मुलाचे यावरुन कान टोचले आहेत. मात्र नितेश राणेंनी नेमकं कुठे आणि काय म्हणाले याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजाकरणात सध्या सुरु असलेलं हे ‘बाप’ प्रकरण काय आहे ते पाहूयात…

मित्रपक्षांवरच घसरले नितेश राणे

नितेश राणे हे मंत्री झाल्यापासून विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहे. ते हिंदुत्वाचा मुद्दा ठामपणे मांडताना दिसत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सभा, भाषणं आणि कामानिमित्त फिरताना ते आपल्या विधानांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. मात्र आता नितेश राणेंचीही हीच तोफ सत्ताधाऱ्यांकडे वळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणेंनी केलेल्या ‘बापा’संदर्भातील विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा धुरळा उठला आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्याआधी त्यांच्या विधानावर त्यांच्या वडिलांनी धारशीवमध्ये पत्रकारांशी बोलताना आज (11 जून रोजी) काय प्रतिक्रिया नोंदवली ते पाहूयात….

नारायण राणे मुलाच्या विधानाबद्दल काय म्हणाले

पत्रकारांनी नितेश राणेंच्या विधानाबद्दल विचारलं असता नारायण राणेंनी, “मुख्यमंत्री हा कुणाचा बाप असतो हे वक्तव्य चुकीचं आहे. मी नितेशला समज दिली आहे.  मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा,” असं उत्तर देत मुलाला समज दिल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनीही फटकारलं

केवळ वडीलच नाही तर स्वत: मुख्यमंत्र्यांनीही नितेश राणेंना फटकारलं आहे. पत्रकारांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, “कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे,” अशी भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी नितेश राणेंच्या विधानाचा विपर्यास केल्याचा संदर्भही त्यांनी दिला. “मी देखील संबंधित मंत्र्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वत: सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ नसला तरी पर्सेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

नितेश राणे काही दिवसांपूर्वी धाराशीव दौऱ्यावर होते. तेथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी केलेल्या विधानावरुनच हा सारा वाद झाला आहे. कार्यकर्त्यांसमोर दिलेल्या भाषणामध्ये नितेश राणेंनी, “भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने नेहमी एक लक्षात ठेवावं, देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. कोणी कितीही इकडे तिकडे नाचले, कोणी कितीही इकडे तिकडे ताकद दाखवली तर शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं,” असं विधान केलेलं. यावरुनच आता नितेश राणे एकटे पडल्याचं दिसत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!