Homeसांस्कृतिकवास्तू शास्त्राच्या टिप्स या 4 गोष्टी आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवणे टाळतात

वास्तू शास्त्राच्या टिप्स या 4 गोष्टी आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवणे टाळतात

या 4 गोष्टी आपल्या खिशात ठेवणे टाळा: आपल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टींचा आपल्यावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होत असतो असं म्हटलं जातं. यामध्ये अगदी घड्याळ असो, पाकिट असो किंवा रोज वापरतो ते कपडे असोत. प्रत्येक गोष्ट ती व्यक्तीबद्दल काही ना काही सांगत असते. बरं या साऱ्या वस्तू आपण कशा वापरता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. व्यक्ती तशा प्रवृत्ती म्हणतात त्याप्रमाणे पाकिटाबद्दल किंवा पर्सबद्दल म्हणता येईल. अनेकजण पाकीट टापटीप ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र पाकिटामध्ये गरजेपेक्षा अधिक वस्तू ठेवणाऱ्यांची संख्याही बरीच आहे.

सकारात्मक गोष्टी घडू देत नाही

पाकिटातील अनेक गोष्टी तर अशा असतात ज्यांचा दैनंदिन आयुष्यात तसा काही उपयोग नसतो पण त्या काही ना काही भावनिक अथवा वेगळ्या कारणाने पाकिटात ठेवलेल्या असतात. यातील काही वस्तू नकारात्मक प्रभाव पाडतात याची फारच कमी लोकांना कल्पना असते. काही गोष्टी पाकिटात ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा वस्तू पाकिटात असतील तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो असं म्हटलं जातं. नकारात्मक गोष्टी पाकिटात आणि पर्यायाने आर्थिक जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडू देत नाही असं म्हणतात. याच नकारात्मक गोष्टींमध्ये अनेक साध्या गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात…

नोटा चुरगळून ठेऊ नका

अनेकजण पाकिटात नोटा ठेवताना त्या व्यवस्थित न ठेवता घडी करुन किंवा चुरगळलेल्या अवस्थेत ठेवतात. हा हातात आलेल्या लक्ष्मीचा अपमान आहे असं म्हटलं जातं. यावरुन सदर व्यक्तीला पैशांची किंमत नाही असंही मानलं जातं. अशा लोकांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. अशा लोकांच्या नशीबात कायम आर्थिक चणचण लिहिलेली असते.

पाकिटात बिलं ठेवणं टाळा

अनेकदा क्रेडिट आणि डेबिट कार्ड पाकिटातच असल्याने एखाद्या गोष्टीचं बील घेतल्यानंतर ते पाकिटात ठेवलं जातं. मात्र बरेच लोक अशी बिलं पाकिटातून दिर्घकाळ काढतच नाहीत. अशी बिलं अनेक महिनेही पाकिटात पडून राहतात. अशाप्रकारे खर्च झालेल्या गोष्टींसंदर्भातील गोष्टी पाकिटात ठेवणं नकारात्मक समजलं जातं. त्यामुळे अशी बिलं लवकरात लवकर काढून टाकावीत.

देवाचे फोटो ठेऊ नका

अनेकजण देवाचा आपल्यावर कायम आशीर्वाद असावा अशा भाभड्या हेतूने पाकिटामध्ये देवी-देवतांचा फोटो ठेवतात. मात्र असं करणं चुकीचं असल्याचं वास्तुशास्रात म्हटलं आहे. अनेकदा आपण पाकिट किंवा पर्स कुठेही टाकतो, ठेवतो. अनेकदा अस्वच्छ हातांनीही पाकिट हाताळावं लागतं. त्यामुळे हा देवी-देवतांचा अपमान ठरतो. यामधून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते.

मृत व्यक्तींचे फोटो ठेवणेही टाळा

अनेकजण आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या मृत व्यक्तीचे फोटो पाकिटात आठवण म्हणून ठेवतात. मात्र वास्तुशास्रानुसार अशाप्रकारे मृत व्यक्तींचे फोटो पाकिटात कधीच ठेऊ नये. असं केल्यास व्यक्ती कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. पाकिटात राग, मत्सर, विरोध अशा भावना दर्शवणाऱ्या व्यक्तीचे फोटो असतील तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. असे फोटो घरातही फ्रेम करुन लावू नयेत असं वास्तुशास्र सांगतं. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हटलं जातं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
spot_img

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
error: Content is protected !!