Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर', पालिका निवडणुकीआधी कोणाला धक्का?

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’, पालिका निवडणुकीआधी कोणाला धक्का?


Eknath Shinde Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू होणारय. सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलंय. दरम्यान शिरसाटांच्या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आलाय.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्यात येणारय. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील इनकमिंग भर दिला जातोय. येणा-या काही दिवसात शिवसेनेत दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलंय.. तर शिंदेंचे खासदार भाजप आणि अजित पवारांकडे जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.

एकनाथ शिंदेंचं काम आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता पाहून पक्षात इनकमिंग सुरू असल्याचं विधान खासदार रवींद्र वायकर यांनी केलंय. मात्र, एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर या फक्त अफवा असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तसंच दिल्लीत एकनाथ शिदेंना कोणतंही महत्व उरलं नसल्याची टीका देखील दानवेंनी केलीय.

विधानसभेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला सुरूवात करण्यात आली होती.. त्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का देत राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. फक्त राजन साळवीच नव्हे तर ठाकरेंच्या अनेक नेत्यांनी शिवबंधन तोडत धनुष्यबाण हाती घेतलाय.. मात्र, इथवरच न थांबता शिंदेंची शिवसेना ठाकरेंना आणखीन मोठे धक्के देण्याच्या तयारीत आहे.

5 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

पक्षात सुरु असलेली आऊट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे. एक खासदारांशी देखील संपर्क सुरू आहे.  दरम्यान यापूर्वी देखील शिवसेना UBTचे 6 खासदार संपर्कात असून लवकरच मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला होता. सुधाकर बडगुजर भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच… सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाविरोधी कृतीमुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.. मंगळवारी बडगुजर यांनी पक्षाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसंच पक्षात आठ ते दहा जण नाराज असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच आता शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी घेतलीये. दोपाली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलंय. ठाकरेंच्या 9 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली. या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. तर रामदास कदम यांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागणार, असा दावाच राऊतांनी केलाय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड

0
मराठी बातम्याराष्ट्रीयबंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड | नितीन नवीन आसनपाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त...

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!