Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र स्थानिक संस्था निवडणूक २०२25 च्या पुढे उधव शिवसेना यांच्यासमवेत राज ठाकरे...

महाराष्ट्र स्थानिक संस्था निवडणूक २०२25 च्या पुढे उधव शिवसेना यांच्यासमवेत राज ठाकरे पार्टी एमएनएसच्या युतीवरील अमित ठाकरे


राज ठाकरे एमएनएस यूबीटी शिवसेना अलायन्स: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच राज्यामध्ये युती आणि आघाड्यांसंदर्भातील चाचपणी सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधुंनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी मागणी यापूर्वीही अनेकदा झाली आहे. मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पुढल्या पिढीतील व्यक्तीही ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करु लागल्या आहेत. आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही दोन्ही भावांनी बोललं पाहिजे असं म्हटलं आहे. अमित ठाकरेंचं हे विधान भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरेंनी सेना-मनसे युतीसंदर्भात मंगळवारीच केलेलं सूचक विधान

मंगळवारीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी त्यांचा पक्ष आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं आहे, अशी आठवण करुन देत संभाव्य युतीसाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. डोंबिवलीमधील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं, असं सांगतानाच आदित्य यांनी हा युतीचाच एक भाग असल्याचं सूचित केलेलं. महाराष्ट्र हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे. मग ते कोणीही असू आम्ही त्यांना सोबत घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हटलं  होतं.

ठाकरे बंधुंनी एकमेकांना साद घातली होती. त्याचं पुढे काय झालं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलेला. त्यावर आदित्य ठाकरेंनी, “आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असेल तर आम्ही त्याला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढा देऊ,” असं म्हटलं होतं.

आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता अमित ठाकरेंचंही सूचक विधान

आता आदित्य ठाकरेनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांचे युती संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी फोनद्वारे संपर्क साधावा एकमेकांचे नंबर दोघांकडेही आहेत असंही अमित ठाकरे म्हणालेत. मुंबईमध्ये पत्रकारांनी अमित ठाकरेंना मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबद्दल विचारलं.

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित ठाकरेंनी, “आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. तसेच थेट नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा उल्लेख न करता अमित ठाकरेंनी खोचक टोलाही लगावला. “जे सकाळी उठून बोलतात ते कोणाला फसवतात?” असा सवाल अमित ठाकरेंनी केला.

तसेच, “दोन भावांनी एकत्र यावं की नाही हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा आहे. यासाठी पुढाकार कोणीही घ्यावा, मी घेऊ शकत नाही,” असंही अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!