Homeमहाराष्ट्रएनसीपीसाठी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यात अजित पवारला मोठा धक्का बसला कारण सर्व...

एनसीपीसाठी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यात अजित पवारला मोठा धक्का बसला कारण सर्व 7 नागालँडचे आमदार सीएम नेफियू रिओ एनडीपीपीमध्ये सामील होतात


अजित पवारसाठी मोठा धक्का: नागालँडमधील सर्व सातही आमदारांनी तेथील सत्ताधारी ‘एनडीपीपी’ पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा मिळविण्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. दोन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता. पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला होता. मात्र आता तो पूर्ण होण्यात नागालँडमधील राजकीय घडामोडींमुळे मोठा अडथळा निर्माण झालाय.

नागालँडमध्ये घडलं काय?

नागालँडमधील विरोधी पक्षाचं बळ अचानकपणे कमी झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रावादीचे सात आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले  आहेत. यामुळे सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार अजून मजबूत झालं आहे. विधानसभा अध्यक्ष शेरिंगेन लॉन्गखुमर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपीमध्ये विलीन होण्याचा निर्णय सांगणारी औपचारिक पत्रे सादर केली. त्यांनी सांगितले की हे विलीनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक आवश्यकता पूर्ण करते.

पक्षाला घवघवीत यश

2023 च्या विधानसभा निवडणुकीत, एनडीपीपी आणि त्यांचा मित्रपक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.  यावेळी राष्ट्रवादीने 12 जागा जिंकल्या.

पक्ष फुटल्यानंतर सर्वजण अजित पवारांच्या पाठीशी होते

महाराष्ट्रापाठोपाठ नागालँडमध्ये अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ चांगले होते. एकत्रित राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सातही आमदारांनी पक्षातील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली होती.पण सातही आमदारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी ‘एनडीपीपी’ पक्षात प्रवेश केला. यामुळे त्या राज्यातील पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या सात आमदारांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मागील 2 वर्षांपासून केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. या आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवलेली.

काय म्हणालेले अजित पवार?

“आमदारांना त्यांच्या भागात काम करू दिले जात नाही. या सात आमदारांसोबत दोन महिन्यांपूर्वी एक बैठक झाली होती. यावेळी आमदारांनी म्हटले होते की, ‘आमचे काम होत नाहीये, आम्हाला समस्या येत आहेत. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणून, त्यांनी सत्ताधारी एनडीडीपीमध्ये काम करणे निवडले,” असं अजित पवार नागालँडमधील पक्षफुटीबद्दल म्हणाले.

राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक असलेले निकष कोणते?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये वैध मतांच्या किमान सहा टक्के मते

चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा

तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा जिंकणे आवश्यक





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!