Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र एटीएस छापा भिवंडी एटीएस कॉम्बिंग ऑपरेशन साकीब नाचन भिवंडी गुन्हेगारी बातमी

महाराष्ट्र एटीएस छापा भिवंडी एटीएस कॉम्बिंग ऑपरेशन साकीब नाचन भिवंडी गुन्हेगारी बातमी


महाराष्ट्र एटीएस रेड भिवंडी: दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने म्हणजेच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा इथं छापा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे. 22 जणांच्या पथकानं कारवाई केली आहे. दहशतवाद्यांसंदर्भात एटीएसनं छापे टाकलेत.. एटीएसनं काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

एटीएस पथकानं साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकलेत. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या सिमी या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साकिबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2002- 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान या कारवाईत आता नेमकी काय आणखी नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात आज सकाळी एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या एटीएसची संपूर्ण टीम सकाळपासून अनेक संशयास्पद व्यक्तींच्या घरी जाऊन छापेमारी करत आहे. यामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे.

नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्रात एटीएसकडून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) शी संबंधित कथित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. यात भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात आज पहाटेपासून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एक मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या कारवाईमुळे संपूर्ण गावात ४५० ते ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसकडून सुरू असलेल्या या छापेमारीदरम्यान 8 ते 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या कारवाईत ठाणे ग्रामीण, रायगड आणि ठाणे पोलीस दलातील कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

बोरिवली गाव दहशतवाद्यांचा तळ

बोरिवली गाव हे साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखलं जातं. यापूर्वीही या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवाईंमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. याच गावातून कुख्यात साकिब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिसमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या १६ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच पुणे येथील एका प्रकरणात चार जणांना येथूनच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे हे गाव सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.

सध्या ताब्यात घेतलेल्या संशयितांची ओळख आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीबद्दल एटीएसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे दहशतवादी कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

साकिब नाचण नक्की कोण?

साकिब नाचण हा प्रतिबंधित स्टूडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चा पदाधिकारी होता. यापूर्वीच दोन दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरला आहे. 20002-2003 मध्ये झालेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता. 2017 मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!