Homeमहाराष्ट्रसीबीएसई वर्ग 1 ते 12 वी इयत्तेच्या पुस्तकात फक्त 68 शब्द इंग्रजी...

सीबीएसई वर्ग 1 ते 12 वी इयत्तेच्या पुस्तकात फक्त 68 शब्द इंग्रजी मध्यम शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक धडा


निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे : (CBSE Textbook) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसईच्या शाळांच्या) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली असली, तरी सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि तोसुद्धा फक्त 68 शब्दांमध्ये समाविष्ट करण्यात आला असून, हे धक्कादायक वास्तव नुकतंच समोर आलं आहे.

सीबीएसईच्या देशपातळीवर शिकवल्या जाणाऱ्या इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांची एकूण पानं आहेत 2200. या सव्वादोन हजार पानांपैकी मराठ्यांच्या इतिहासाला फक्त दोन पानांचंच महत्त्वं देत तो अक्षरशः गुंडाळून टाकण्यात आला आहे.

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे त्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन फक्त अकरा ओळींमध्ये करण्यात आलं असून, महाराजांबाबत केवळ 68 शब्द पाठ्यपुस्तकात पाहायला मिळत आहेत. म्हणजेच, माध्यमिक शाळांमधील मुलांना शिवाजी महाराजांची माहिती केवळ 68 शब्दांमध्येच!

सीबीएसईच्या पाठ्युपुस्तकांत महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिसाहाला मिळालेली जागा पाहता या विरोधात मराठा संघटना आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. ज्या विरोधात गुरुवारी पत्रकार परिषद घेत तिथं यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे.

हेसुद्धा वाचा : खिल्जी- मुघल कायमस्वरुपी ‘दफन’; शालेय पाठ्यपुस्तकातून सर्व संदर्भ हटवले, ‘या’ विषयांना मिळाली जागा

पुण्यातील मराठा समन्वयक पाठ्यपुस्तरासंदर्भातील विरोध दर्शवत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही भूमिका मांडली जाणार असून, शासन आणि मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील पत्र सादर करत पुढील भूमिका मांडल्या जाणार आहेत. तेव्हा यावर आता याबाबत राज्य सरकारला निवेदन देण्यात आल्यास पुढं त्यांची काय भूमिका असेल हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला:ज्या हरियाणवी वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले,...

0
NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप...

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

0
अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे...

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे...

0
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात...

daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...
spot_img

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...

0
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...
error: Content is protected !!