Homeमहाराष्ट्रहागावणे कौटुंबिक वकील असा दावा करतात

हागावणे कौटुंबिक वकील असा दावा करतात


Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हगवणे कुटुंबीयांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसाची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला आहे. तसंच तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे.

सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की, “आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. आरोपींचे मोबाईल तपासायचे आहेत. कदाचित मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचा आहे‌. आत्तापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे”.

त्यानंतर आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद करायला सुरुवात केली. आता पोलीस कोठडीची गरज नाही असा दावा त्यांनी केला. “सोने कुठल्या बँकेत गहाण ठेवले आहे हे हगवणेंनी आधीच सांगितंल आहे. निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने बाळाला सांभाळलं. पण उलट हेळसांड केली म्हणून निलेश चव्हाणवरच गुन्हा दाखल केला आहे.  निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे”, असं वकील म्हणाले.

आरोपींच्या वकिलांनी यानंतर वैष्णवीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌, ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे,” असं ते म्हणाले.

हगवणेंचे वकील – वैश्नवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून ती आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून.

हगवणेंच्या वकिलाने म्हटलं की, “वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता”.

दरम्यान यावेळी वकिलाने बायकोला कानाखाली मारणं छळ नाही असा अजब युक्तिवाद केला. “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही,” असा युक्तिवाद त्याने वैष्णवीच्या अंगावरील व्रणांसदर्भात बोलताना केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!