लखनऊ सुपर जायंट्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) ने आईपीएल 2025 च्या शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सला पराभूत करून क्वालिफायर-1 मध्ये त्यांचे स्थान निर्माण केलं आहे. मंगळवारी 27 मे रोजी लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर जितेश शर्माच्या नाबाद 85 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने एक मोठा विजय मिळवला. आता त्यांचा पुढचा सामना 30 मे रोजी पंजाब किंग्जशी होणार आहे.
जितेशने मिळवून दिला दमदार विजय
लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी 228 धावा केल्या. 228 धावाचा सामना करण्यासाठी आरसीबीने जलद गतीने सामना खेळण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने 30 चेंडूमध्ये 54 धावा केल्या. तर फिल साल्टने 19 चेंडूत 30 धावा केल्या. फक्त 5.4 ओवरमध्ये दोघांनी 61 धावा केल्या. रजत पाटीदार आणि लियाम लिविंगस्टोनच्या अपयशामुळे संघ अडचणीत आला होता. परंतु स्टँड-इन कर्णधार जितेशने 85 धावा आणि मयंक अग्रवाल 41 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.
विराट-कारुनलचन उत्सव
19 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूत आयुष बदोनीच्या चेंडूवर षटकार माऊन जितेशने सामना संपवला. सामना जिंकल्यानंतर संघात आनंदाची लाट उसळली. विराट कोहली आणि क्रुणाल पंड्या यांचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. दोघांनी एकमेकांना मिठी मारून इतर खेळाडूंनीही मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला.
स्टँडमध्ये बसलेल्या बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शऱ्मानेही मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला. सामना जिंकताच अनुष्काने देखील जाग्यावर उडी मारून आपला आनंद साजरा केला आहे. यावेळी अनुष्काने संघाला देखील प्रोत्साहन दिले. त्याचवेळी सामना जिंकल्यानंतर विराटने अनुष्काकडे बोट दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ते पंप अप केले आहेत आणि कसे @Rcbtweets त्यांच्या करिश्माईक कर्णधार जितेश शर्मा यांच्या नेतृत्वात गतीसह प्रविष्ट करा
स्कोअरकार्ड ▶ #Takelop | #LSGVRCB pic.twitter.com/n0yaz0f95u
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 27 मे, 2025
दरम्यान सामना जिंकल्यानंतर जितेश शर्माने देखील त्याचा सहकारी मयंक अग्रवालसोबत आनंद साजरा केला. दोघांनी एकमेकांना मिठी मारून मैदानावरच डान्स केला. त्याच वेळी आरसीबी विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर अवेशने त्याचे हेल्मेट काढून फेकल्यासारखे केले आणि आवेशला दाखवले.
आरसीबी आणि पंजाब संघ आता 29 मे रोजी क्वालिफायर-1 मध्ये भिडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ आता थेट अंतिम फेरीत जाणार आहे. पराभूत संघाला दुसरी संधी मिळेल. ती 1 जून रोजी क्वालिफायर-2 मध्ये खेळेल. 30 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना खेळला जाईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. तर विजयी संघाला 1 जून रोजी क्वालिफायर- 2 मध्ये खेळावे लागेल.






























