Homeमहाराष्ट्रपुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची 'ती' प्रथा केली रद्द!

पुण्यातील ‘या’ ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; मंदिरात दर्शन घेण्याची ‘ती’ प्रथा केली रद्द!

आज पुणे न्यूज: महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच एक निर्णय पुण्यातील देवस्थानाबाबत घेण्यात आला होता. मात्र ग्रामसभेने हा निर्णय रद्द केला आहे. पुण्यातील नसरापूर ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय घेत ‘शर्ट काढून मंदिरात दर्शन घेण्याची ‘ प्रथा रद्द केली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

नसरापूर येथील प्रसिद्ध बनेश्वर महादेव मंदिरात पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेणे बंधनकारक करण्याची प्रथा अखेर ग्रामसभेच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर घेण्यात आलेला हा निर्णय लोकशाही प्रक्रियेचा सकारात्मक नमुना ठरला आहे. मंदिर ट्रस्टने काही महिन्यांपूर्वी शर्ट काढून दर्शन घेण्याचा नियम लागू केला होता. मात्र, 1 मे रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करत याला विरोध दर्शवला होता. अर्जात नमूद करण्यात आले की, ही नव्याने सुरू झालेली प्रथा भाविकांसाठी त्रासदायक ठरते, काहीवेळा महिला भाविकांनाही अस्वस्थतेला सामोरे जावे लागते.

ग्रामसभेत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. राजेश शामराव कदम यांनी सुचवलेला आणि प्रज्योत प्रताप कदम यांनी अनुमोदन दिलेला ठराव ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. या ठरावात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की, ‘भाविकांमध्ये भेदभाव न होता समान नियम लागू व्हावेत, आणि सध्याच्या सामाजिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर शर्ट काढण्याची अट अयोग्य आहे.’ ग्रामसभा सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण आणि सर्व सदस्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासोबतच हा ठराव धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे, जेणेकरून मंदिर ट्रस्टला योग्य त्या सूचना दिल्या जातील.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:3 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले, 1 बेपत्ता

0
अमेरिकेच्या नौदलाच्या MH-60S सीहॉक हेलिकॉप्टरने बुधवारी अरबी समुद्रात आपत्कालीन जल-लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील चार क्रू सदस्यांपैकी तिघांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर एक जण अजूनही...
spot_img

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

20% कपात ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यांचे आश्वासन

0
मराठी बातम्याव्यवसायभारतातील वायू प्रदूषणात कपात: 20% कमी करण्याचे आश्वासन ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यानवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी करादेशातील हवा जेवढी...
error: Content is protected !!