Homeमहाराष्ट्रमुंबई आणि कोकण येथे महाराष्ट्र हवामान बातम्या गारपीट आणि मध्य महाराष्ट्र ते...

मुंबई आणि कोकण येथे महाराष्ट्र हवामान बातम्या गारपीट आणि मध्य महाराष्ट्र ते प्रयोग वादळ पाऊस पावसाळ्याच्या पूर्वसूचक पाऊस


हवामान बातमी: उत्तर भारतापासून ते अगदी दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र हवामानात मोठे बदल होत असून, बहुतांशी उत्तर भारतीय राज्यांमध्ये धुळीचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान वाऱ्याचा वेग इतका मोठा होता, की संपूर्ण आभाळ यामुळं झाकोळलं गेलं होतं. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून, राजस्थानच्या वाळवंटीय भागातून आलेली ही धूळ  दिल्ली पंजाबपासून सर्व उत्तर भारतामध्ये वातावरणावर परिणाम करताना दिसणार आहे.

महाराष्ट्राला वादळी पावसाचा इशारा…. (Maharashtra Weather News)

मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. सातारा जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. तर, पश्चिम बंगाल, रायलसीमापासून मराठवाडा, कर्नाटक आणि केरळापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं राज्यावर सध्या अवकाळीसह पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.

कोकणात पावसाची दमदार हजेरी…

कोकणात मागील 48 तासांपासून पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असून, गुरुवारी येथील बहुतांश भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

मुंबईत वादळी पावसाचा अंदाज

मागील 24 तासांमध्ये मुंबईतही आकाश अंशत: ढगाळ असल्याचं दिसून आलं तर बुधवारी सायंकाळनंतर पावसाळी ढगांनी शहरातील आकाश व्यापलं, परिणामी गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एकिकडे अवकाळी आणि पूर्वमोसमी (Monsoon) पावसासाठी राज्यात पूर्णत: पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच दुसरीकडे नैऋत्य मोसमी वारे अंदमानातून पुढे सरकत आहेत. वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता पुढील दोन दिवसांत ते अरबी समुद्र, मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेनं वाटचाल करतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

भारतीय खलाश राकेश चौहानचे अवयव बेपत्ता |

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराव्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ:भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

0
आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री...
spot_img

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...
error: Content is protected !!