Homeमनोरंजनभारत पाकिस्तान युद्धावरील वीरेंद्र सेहवाग त्यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आणि सांगितले की...

भारत पाकिस्तान युद्धावरील वीरेंद्र सेहवाग त्यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आणि सांगितले की आमची शक्ती सर्वात योग्य पद्धतीने उत्तर देईल


वीरेंद्र सेहावाग: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मू सह भारताच्या विविध शहरांमध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. त्यांनी पठाणकोटच्या एअरबेसवर सुद्धा अटॅक केला. पाकिस्तानी सैन्याच्या निशाण्यावर भारतीय सैन्याचे बेस होते. त्यानंतर भारताने एअर डिफेन्स सिस्टम S400 ला ऍक्टिव्ह करून पाकिस्तानचे 8 मिसाईल आणि अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारत – पाकिस्तान युद्ध सुरु असताना भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विट करत म्हंटले की, ‘पाकिस्तानला शांत राहण्याची संधी असताना त्यांनी युद्ध निवडले आहे. ते त्यांच्या दहशतवादी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढे आले होते, आणि त्यांच्याबद्दल खूप काही बोलत होते. आपले सैन्य सर्वात योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देईल, अशी पद्धत जी पाकिस्तान कधीही विसरणार नाही’.

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांवर हल्ले केले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं आणि त्यांना उध्वस्त केलं. ज्यात लश्कर-ए-तैयबा आणि जैश- ए- मोहम्मद यांच्या दहशतवादी टाळ्यांचा तळांचा सुद्धा सहभाग होता.

हेही वाचा : भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! आज होणार होती PSL ची मॅच

8 मे च्या पहाटे ऑपरेशन सिंदूरचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानने भारताच्या 4 राज्यांमधील 15 शहरांवर मात्र हे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावले. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. भारतीय सशस्त्र दलांनी 8 मे च्या सकाळी पाकिस्तानमधील लाहोर सह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केली. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं. यानंतर सुद्धा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानला उद्देशून ट्विट केलं. त्यांनी म्हंटले की, ‘जर कोणी तुमच्यावर दगड फेकत असेल तर तुम्ही त्याच्यावर फुल टाका पण कुंड्यांसकट. जय हिंद!’ .  तसेच अजून एक ट्विट करत त्याने ‘धर्मो रक्षति रक्षत: जय हिंद की सेना’ असं देखील लिहिलं. वीरेंद्र सेहवागच्या या ट्विटवर नेटकरी विविध प्रक्रिया देत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!