Homeमहाराष्ट्रJalgaon Newly wed solider manoj patil got called on duty after Operation...

Jalgaon Newly wed solider manoj patil got called on duty after Operation Sindoor India Pakistan War; India Pakistan War : लग्नाची हळदही उतरली नव्हती अन्… जळगावचा जवान मनोज पाटील 2 दिवसांत कर्तव्यावर रवाना


वाल्मिक जोशी, झी मिडिया, जाल्गाव: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे.

सन 2017 मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी 5 मे रोजी विवाह झाला. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरेने बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झाले आहेत. आज नववधुसोबत मनोज पाटील सत्यनारायणाच्या पुजेला बसणार होते. पण पूजा रद्द करुन जवान मनोज पाटील रवाना झाले आहेत.

लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झाले.  मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवारी सीमेवर रवाना झाले आहेत.

पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते, पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्यामुळे घरातील मंडळींना थोडे दुःख झाले. पण या परिस्थितीत माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!