भारत आणि पाकिस्तानवरील बाबा वांगा यूट्युर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारत या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्रालयानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये युद्धसज्जतेच्या धर्तीवर 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यमध्ये युद्धामुळे भीतीचं वातावरण आहे. तरदुसरीकडे बाबा वांग यांच्या भविष्यवाणीमुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येते आहे. बाबा वांग यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया.
भारत – पाकिस्तान युद्धाबद्दल बाबा वांगाने काय केलं भाकीत?
न्यू यॉर्क पोस्टनुसार, बाबा वांगाने युरोपचा पाया हादरवून टाकणाऱ्या संघर्षाचा इशारा दिला. त्यांनी कोणत्याही देशाचं नाव घेतले नाही. मात्र त्यांचा इशारा अशा वेळी आला आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. जगात अस्थिरता वाढत असताना, अनेक वर्षांपूर्वी केलेली त्यांची भविष्यवाणी आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. वांगा यांनी 2025 मध्ये विनाशकारी भूकंपांचा अंदाजही वर्तवला होता. 28 मार्च रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला आणि 1,700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. या भूकंपाचा फटका थायलंडलाही बसला. जिथे किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोण आहे बाबा वांग?
बाबा वांग ही एक महिला होती. बाबा वांगाचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला. तिचं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होतं. वयाच्या 12 व्या वर्षी एका हिंसक वादळात तिने आपली दृष्टी गमावली, या घटनेने तिला भविष्य पाहण्याची शक्ती दिली असा दावा तिने नंतर केला. अनेक प्रमुख जागतिक घटनांचे अचूक भाकित करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. तिचं निधन 1996 मध्ये झाले, मात्र त्यांच्या भविष्यवाण्या आजही त्यांच्या अनुयायांमधून आणि इतरांकडून प्रसारित केल्या जातात. काही लोकांना त्याच्या भाकित्यांवर शंका आहे, तर काहींना त्यांच्या अचूकतेबद्दल आश्चर्य वाटते. याआधीही, 9/11 दहशतवादी हल्ले, 1997 मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि कोविड-19 साथीच्या आजारासारख्या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.






























