Homeमहाराष्ट्रपुणे पुणेमध्ये 40000 कोटी नवीन सुपरफास्ट हायवे पुणे-बेंगलुरू एक्सप्रेसवे 2 फ्लायओव्हरसह 55...

पुणे पुणेमध्ये 40000 कोटी नवीन सुपरफास्ट हायवे पुणे-बेंगलुरू एक्सप्रेसवे 2 फ्लायओव्हरसह 55 उड्डाणपुल आणि 22 इंटरचेंज


पुणे-बेंगलुरू एक्सप्रेसवे: मुंबईतून आता फक्त 6 तासांत आता बंगळुरु पोहचता येणार आहे. मुंबई आणि बंगळुरु दरम्यान ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. याच पुणे बंगळुरु द्रुतगती महामार्गाचे (Pune-Bengaluru Expressway) काम अती जलद गतीने सुरु आहे.

भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे ते बंगळुरू दरम्यान सुमारे 700 किमी लांबीचा ग्रीन एक्स्प्रेस हायवे उभारला जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या रिंग रोडपासून एक वळण लागेल आणि तिथून हा हायवे सुरु होणार आहे. आयटी हब असलेल्या पुणे आणि बंगळुरु  या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग  बांधला जात आहे.  या सुपफास्ट हायवेच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे.

सध्या मुंबईतुन बंगळुरुला जाण्यासाठी 18 ते 19 तास लागतात. तर,  पुणे ते बंगळुरु हा प्रवास 15 – 16 तासांचा आहे. नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे-बंगळुरु प्रवास फक्त 5 ते 4 तासांत होणार आहे. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईहून बंगळुरुला फक्त 6 तासांत पोहचता येणार आहे.

नवा द्रुतगती महामार्ग अ‍ॅक्सेस-कंट्रोल ग्रीनफिल्ड स्वरुपाचा असणार आहे. या द्रुतगती मार्गावर 2 आपत्कालीन हवाई पट्टी, 55 उड्डाणपूल  22 इंटरचेंज असणार आहेत. यावर फक्त हायस्पीड वाहनांना परवानगी असेल. या एक्स्प्रेस वेवर वाहन ताशी 120 किमी वेगाने वाहने धावणार आहेत.

बंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकातील 9 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रात हा मार्ग पुणे रिंगरोडवरील कांजळे येथून सुरू होऊन पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. कर्नाटकात, बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगलोर ग्रामीण या जिल्ह्यांतून हा महामार्ग बंगळुरु शहरात संपणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) देखरेखीखाली हा द्रुतगती मार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग 8 लेनचा असणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगाल- माजी TMC आमदारावर लोकांनी अंडी फेकली:पोलीस ठाण्याबाहेर ‘चोर-चोर’च्या घोषणा; पोलिसांनी कर्नाटकातून पकडून हुगळीला...

0
पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात रविवारी माजी टीएमसी आमदार रामेंदू सिन्हा राय यांच्याविरोधात लोकांचा संताप पाहायला मिळाला. पोलिसांनी त्यांना धानियाखाली पोलीस ठाण्यात आणताच, बाहेर...

22 जूनचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचा उत्पन्नाचा स्रोत पुन्हा सुरू होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात...

0
सोमवार, 22 जून रोजी मेष राशीच्या नोकरदार लोकांना टीमवर्कमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना पुढे...

केप वर्देने उरुग्वेला २-२ असे बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: केप वर्देने उरुग्वेला 2-2 ने बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सोमवारी ग्रुप...

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

0
बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या...
spot_img

केप वर्देने उरुग्वेला २-२ असे बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: केप वर्देने उरुग्वेला 2-2 ने बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सोमवारी ग्रुप...

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...
error: Content is protected !!