Homeमहाराष्ट्रआंबाप्रेमींनो सावधान! तुम्हाला विकला जातोय सडक्या आंब्यांचा आमरस; परिस्थिती ऐकून बसेल धक्का

आंबाप्रेमींनो सावधान! तुम्हाला विकला जातोय सडक्या आंब्यांचा आमरस; परिस्थिती ऐकून बसेल धक्का

योग्य आंब्याचा रस: उन्हाळा सुरु असून आंब्याचा सिझनदेखील सुरु झालाय. आमरस प्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे. तुमच्या वाटीत येणारा आमरस खरंच अस्सल ताज्या आंब्यांपासून बनलेला असेल याची काही खात्री नाही. पिवळाजर्द दिसणारा आमरस कदाचित सडक्या आंब्यांपासूनही बनवलेला असू शकतो. यामागे कारणही तसंच आहे. कारण नवी मुंबईत अशा एका गलिच्छ आमरस कारखान्याचा पर्दाफाश झालाय.

उन्हाळ्यात आमरस म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शहरात अनेकजण अगदी कितीही पैसे मोजून आमरस विकत आणतात आणि तो खातात. मात्र ही दृश्य बघितली तर पुन्हा तुम्ही बाजारातून आमरस विकत आणायचं धाडस करणार नाही. नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेनं धाड टाकली. तेव्हा अतिशय धक्कादायक दृश्य समोर आलं. एका चाळीतल्या खोलीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. याच सडक्या आंब्यांपासून आमरस बनवला जायचा. या आमरसचं श्रीजी या नावानं ब्रॅण्डिंग करुन नवी मुंबई आणि आसपासच्या शहरात विकलं जात होतं.

या सडलेल्या खराब झालेल्या आंब्यांसपासून रोज तब्बल 6 हजार लिटर आमरस बनवला जातो. धक्कादायक म्हणजे या आमरस बनविणाऱ्या कारखान्याकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स.. मात्र बिनबोभाट नागरिकांच्या आयुष्याशी खेळ सुरू होता.

मनसेनं या घाणेरड्या आमरस कारखान्याचा भांडाफोड केला. त्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिली मात्र मनपा अधिकारी कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यामुळं या अधिकाऱ्यांना कारवाई टाळण्यासाठी कोणती मलाई खाऊ घालण्यात आलीय. असा सवाल उपस्थित होतोय.

आजकाल कोणताही अन्नपदार्थ शुद्ध, चांगल्या प्रतिचा मिळेल याची कोणतीच खात्री नाही. चार पैसे कमावण्यासाठी असं घाणेरडं आमरस बनवून ते शेकडो घरात ताजं, रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह विरहीत म्हणून विकलं जातंय. किमान आतातरी अशा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाने आणि कंपन्यांवर तात्काळ कठोर केली जाणार असा सवाल आता नागरिकच विचारताहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...

भारताने म्हटले- पाक राष्ट्रपतींचे विधान द्वेष पसरवणारे:आमच्या बाबतीत हस्तक्षेप करू नका; झरदारी म्हणाले होते-...

0
पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी भारताच्या मशिदीबद्दल केलेल्या भडकाऊ विधानावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारताच्या...
spot_img

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...

टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मूल्य ₹2.15 लाख कोटींनी वाढले:एअरटेल टॉप गेनर ठरली, मूल्य ₹52,432...

0
जागतिक बाजारातील सुधारलेल्या भावनांमुळे गेल्या आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 2.15 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या...
error: Content is protected !!