फुलंब्री नगरपंचायतच्या आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये १९ बुथवर १३३ कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ५४ तर, नगराध्यक्षपदासाठी ३ जण रिंगणात आहेत. नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडणार होती. परंतु नगरपंचायतच्या
.
तर, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल राखीव ठेवला होता. १७६३० मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८४३३ महिला तर ९ हजार १९६ पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९ बुथवर १३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना बूथनिहाय मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले. फुलंब्री तहसील कार्यालयात प्रत्येक कर्मचारी मतदान यंत्र तपासून घेताना आढळून आले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीची महत्वाची कागदपत्रे, संवैधानिक आणि असंवैधानिक लिफाफे, ईव्हीएम मशीनची मेमरी कोषागार कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवण्यात येते.
त्यामुळे तालुका स्तरावरील सर्व उप कोषागार कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. निकालाबद्दल कोणी आक्षेप घेतल्यास ईव्हीएमच्या मेमरीचा उपयोग मतमोजणीसाठी केला जाऊ शकतो. फुलंब्री आणि पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथील काही जागांसाठी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी मत मोजणी होईल. सकाळी १० वाजता सुुरुवात होणार आहे. वैजापूर येथे १२, पैठण येथे १५, गंगापूर १०, सिल्लोड १२, कन्नड १२ तर खुलताबाद १० टेबलवर मतमोजणी होईल. प्रभाग क्र. ६/१ (जि.प. शाळा खोली क्रमांक १३) हे सखी मतदान केंद्र आहे. प्रभाग क्रमांक ६/२ (जि.प. शा. खोली क्रमांक १५) हे दिव्यांग आदर्श मतदान केंद्र असेल. प्रभाग क्र. २ हे आदर्श मतदान केंद्र संत सावता माळी महविद्यालयात आहे. वैजापुरात नगरसेवक पदासाठी दोन प्रभागातील दोन जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जागांसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. प्रभाग क्र. एक अ व प्रभाग २ ब येथे मतदान होत आहे.
पैठणमध्ये प्रभाग ३, ६ व ११ मधील तीन जागांसाठी आज शनिवारी (२० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी २ क्षेत्रीय अधिकारी, ८० कर्मचारी तर इतर १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






















