Homeमहाराष्ट्र11 Mayor, 87 Corporator nominations filed on last day in Nandgaon Khandeshwar...

11 Mayor, 87 Corporator nominations filed on last day in Nandgaon Khandeshwar | काँग्रेसचे अक्षय पारसकर भाजपमध्ये: नांदगाव खंडेश्वरमध्ये शेवटच्या दिवशी 11 नगराध्यक्ष, 87 नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल – Amravati News

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राजकीय घडामोडींनी वेग घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांना धक

.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती न करता नगराध्यक्ष आणि सर्व १७ नगरसेवक पदांसाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी युती केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचीही युती झाल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या युतींनीही नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदांसाठी अर्ज भरले.

भाजपमधील बंडखोरी स्पष्टपणे समोर आली. भाजपच्या बंडखोर सुरेखा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, भाजपच्या कल्पना मारोटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – शिवसेना (शिंदे गट) युतीकडून उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग १७ मधून भाजपचे विशाल गुल्हाने यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्षानेही काही प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले आहेत.

नांदगाव खंडेश्वर शहरात एकूण १७ प्रभाग आहेत. शहरात एकूण १२,०३९ मतदार असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९८ उमेदवारांनी आपले अर्ज भरले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ११ आणि नगरसेवक पदासाठी ८७ अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी जाधव, नगर पंचायतीचे प्रशासक निवृत्ती भालकर, सर्व कर्मचारी तसेच ठाणेदार श्रीराम लांबडे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!