Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकहिंदुविरोधी व्यवस्थेचा बळी : समीर गायकवाड

हिंदुविरोधी व्यवस्थेचा बळी : समीर गायकवाड

 

प्रस्तावना : ‘‘सरकार किसीकी भी हो, व्यवस्था तो हमारी है,’’ हा केवळ ‘सिने-संवाद’ नाही, तर ते आजचे विदारक वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली ही व्यवस्था इतकी बुरसटलेली आहे की, सत्ता कुणाचीही असो, व्यवस्थेचा ‘हिंदुविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ चेहरा सहसा बदलत नाही. याच व्यवस्थेत देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना आणि नक्षलवाद्यांना ‘विचारवंत’ म्हणून डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. याच पक्षपाती व्यवस्थेच्या दिरंगाईचा आणि जाचाचा बळी ठरले आहेत, सनातन संस्थेचे निष्पाप साधक समीर गायकवाड! समीर यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून, एका निर्दोष जीवाचा या निष्ठुर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे.

समीर यांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? : गेल्या दशकात दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या हत्या प्रकरणांची प्रचंड चर्चा झाली. माध्यमांनी या व्यक्तींना अवास्तव प्रसिद्धी देऊन मोठे केले; परंतु या हत्यांचा तपास निष्पक्षपणे करण्याऐवजी, एका विशिष्ट विचारसरणीला लक्ष्य करण्यासाठी आणि ‘भगव्या दहशतवादा’चे खोटे नॅरेटिव्ह रुजवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर झाला. तपासातील त्रुटी म्हणजे हत्येमागे आर्थिक वाद, कौटुंबिक कलह, बाईचे प्रकरण किंवा व्यावसायिक शत्रुत्व असे अनेक पैलू असू शकतात; मात्र तपास यंत्रणांनी केवळ ‘सनातन संस्थे’ला लक्ष्य करून चारही हत्यांचा सखोल तपास न करता ‘कॉपी-पेस्ट’ पद्धतीचे आरोपपत्र प्रत्येक ठिकाणी दाखल केले.

समीर यांना २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. एका गाडीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी हत्या केली. त्यातील एक समीर गायकवाड आहे, असे तपास यंत्रणांनी सांगितले. वास्तविक हत्येच्या दिवशी समीर गायकवाड हे पालघरला होते. तपासादरम्यान पोलिसांनाही त्यांच्या कॉल डिटेल्सद्वारे आढळून आले की, पानसरेंच्या हत्येच्या दिवशी समीर गायकवाड पालघर येथे होते; पण कोणाच्या दबावामुळे त्यांनी ते न्यायालयासमोर आणले नाही, याचा तपास व्हायला हवा ! उलट एक शाळकरी मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आणला, त्याने समीर यांना ओळखले; पण वर्षभरातच समीर खूनी नसून ते दोन खूनी भलतेच आहेत म्हणून जाहीर केले. काही महिन्यांनी पुन्हा नवीन दोन नावे समोर आणली. मग दुसरे दोन जर हत्यारे असतील, तर पहिल्यांवरचे आरोप रहित केले पाहिजे होते; पण ते हेतूतः केले गेले नाहीत. याचा अर्थ, समीर निर्दोष असल्याचे माहीत असल्याने त्यांचा खटला चालवायचा नाही आणि दुसरीकडे त्यांचे नाव असलेले पहिले दोषारोपपत्र कायम ठेवून त्यांचा समाजिक जीवन उद्ध्वस्त करून छळही करायचा, ही असुरी प्रवृत्ती आहे.

या हेतुपुरस्कर व खोट्या तपासामुळे समीर गायकवाड यांच्यासारख्या पापभिरू साधकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. खोट्या आरोपांमुळे झालेली बदनामी आणि न्यायालयीन प्रक्रियेचा ताण यांमुळे सार्वजनिक आणि जीवन जगण्यात येत असलेल्या अडचणी यांमुळे समीर प्रचंड ताणाखाली होते आणि यामुळेच समीर यांना हृदयविकाराचा झटका आला  असे त्याचे कुटुंबीय ठामपणे सांगत आहेत. हा नैसर्गिक मृत्यू नसून, हिंदुविरोधी व्यवस्थेने, डाव्या विचारसरणीच्या टोळ्यांनी आणि तपास यंत्रणांनी केलेल्या ‘खोट्या आरोपांचा बळी’ आहे.

निर्दोषत्वाचा सर्वात मोठा पुरावा : ‘खटला चालवा’ ही मागणी! : समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व सिद्ध करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची आणि त्यांच्या वकिलांची भूमिका. सर्वसाधारणपणे गुन्हेगार खटला लांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या प्रकरणात समीर गायकवाड यांनी स्वतःहून “माझा खटला लवकरात लवकर Fast Track चालवा,” अशी लेखी मागणी केली होती. दुसरीकडे, पानसरे कुटुंबीय आणि तपास यंत्रणा मात्र खटला रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. अजमल कसाबसारख्या नराधम अतिरेक्याला सरकारी खर्चाने वकील मिळतो; मात्र केवळ एक हिंदु, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून समीर यांना वकील मिळू दिला जात नाही. दहशतवादाच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेल्या अतिरेक्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय उघडते; पण संविधानाच्या गप्पा मारणारे समीर यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतात, ही लोकशाहीची थट्टा आहे.

खोटे नॅरेटिव्ह हाणून पाडा : आजच्या व्यवस्थेत ‘हाऊस अरेस्ट’चे कोणतेही प्रावधान नाही; पण तरीही पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांना ‘हाऊस अरेस्ट’ करण्याचे फर्मान सोडले जातात. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर न्याय व्यवस्थेकडून शोक व्यक्त होतो; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त होऊन भाजप सरकारवर टीका केली. तसेच थेट  संयुक्त राष्ट्र संघाकडून शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले जाते. यातून इकोसिस्टीम किती मोठी आहे हे समजते. ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणारा उमर खालिद याची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी न्यूयॉर्कचे महापौर ममदानी पत्र लिहितात. समीर गायकवाड हे या हिंदुविरोधी नॅरेटिव्हचे बळी ठरले आहेत. त्यांच्यासाठी कोण पत्र लिहिल का, कोण आवाज उठवणार का?, हा प्रश्न आहे. जर भविष्यात असे बळी जाऊ द्यायचे नसतील, तर देशरक्षण आणि धर्मरक्षणाची तळमळ असणाऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. केवळ ‘फील गुड’ अर्थात् ‘सर्व काही छान चालले आहे’ या भ्रमात न राहता, या व्यवस्थेतील डाव्या विचारसरणीच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांचा ढोंगीपणा उघडा पाडणे आणि हिंदुविरोधी अपप्रचाराच्या विरोधात सक्षमपणे लढा देणे, हीच समीर गायकवाड यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल!

– श्री. चेतन राजहंसराष्ट्रीय प्रवक्तेसनातन संस्था

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!