Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकरंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’मध्ये महिलांचा उत्स्फूर्त...

रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’मध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग !

२४ वर्षांची मोहीम यंदाही १०० टक्के यशस्वी

पुणे – रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत मोठ्या संख्येने महिलांनी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत यंदा रंगपंचमी आणि महिला दिन या दोनही निमित्तांनी रविवारी सुट्टीचा दिवस असूनही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जलाशय रक्षणाचे कार्य केले. रंगपंचमीच्या निमित्ताने जलाशयात रंग, कचरा किंवा इतर प्रदूषक पदार्थ टाकले जाऊ नयेत, यासाठी त्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले. गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाही १०० टक्के यशस्वी झाले. या मोहिमेत शासन आणि प्रशासन यांचे सहकार्य लाभले असून पोलीस, स्थानिक प्रशासन तसेच विविध विभागांनी आवश्यक ती मदत केली. त्याचबरोबर पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून या अभियानाला बळ दिले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी पर्यावरण रक्षणासाठीही पुढाकार घेतल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
सकाळी ८ वाजता भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि भावपूर्ण आरती करून या मोहिमेचा आरंभ झाला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सासवड, हडपसर, भोर आणि आळंदे वाडी यांसारख्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या अभियानात अधिवक्ता, संगणक अभियंता, उद्योजक पत्रकार यांनी सक्रिय सहभाग घेतला

या अभियानादरम्यान उपस्थित असलेल्या मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. “पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी समितीचे कार्यकर्ते ज्या जिद्दीने जलाशयाभोवती उभे राहतात, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशी अभियाने आता लोकचळवळ बनणे आवश्यक आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

मोहिमेच्या शेवटी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्व सहभागी नागरिकांचे आणि सहकार्य करणाऱ्या यंत्रणांचे समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!