Homeमुळशीमुळशी केसरी स्पर्धेचा भव्य सोहळा रविवारी; १८ वर्षांची अखंड परंपरा

मुळशी केसरी स्पर्धेचा भव्य सोहळा रविवारी; १८ वर्षांची अखंड परंपरा

मुळशी : मुळशी तालुक्यातील कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ यंदा सलग १८व्या वर्षी अधिक भव्य आणि विक्रमी स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने होणारी ही प्रतिष्ठित स्पर्धा रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी घोटवडे फाटा, सुंदरबन लॉन्स, ता. मुळशी, जि. पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या स्पर्धेच्या सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत वजन मोजणी होणार असून, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुळशी केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. भास्कर मोहोळ व अध्यक्ष श्री. राजेंद्रभाऊ बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे.

महाराष्ट्र केसरीनंतर सलग सर्वाधिक वर्षे अखंड सुरू असलेली ही राज्यातील एकमेव कुस्ती स्पर्धा असल्याने मुळशी केसरीला विशेष मान मिळाला आहे. राज्यभरातील नामांकित पहलवान, प्रशिक्षक, पंच तसेच दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

आकर्षक पारितोषिकांची खैरात

स्पर्धेत ५७, ६१, ६५, ७० व ७४ किलो वजनगटांचा समावेश असून प्रत्येक गटासाठी रोख बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत.

५७ व ६१ किलो गटात प्रथम क्रमांकास ₹१५,०००, ६५ व ७० किलो गटात ₹२१,०००, तर ७४ किलो गटात ₹२५,००० रोख व चषक देण्यात येणार आहेत.

मुळशी केसरी – ग्रँड प्राईज

मुळशी केसरी विजेत्यास ₹३१,००० रोख व खरी चांदीची गदा, उपविजेत्यास ₹२१,०००, तृतीय ₹१५,००० व चतुर्थ ₹११,००० रोख व चषक देण्यात येणार आहेत. तसेच सर्व गटातील विजेत्यांना चषक, रोख बक्षिसे, चांदीची नोट, ट्रॅकसूट व आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

या कुस्ती महोत्सवात मुळशीच्या मातीतील परंपरा, लढाऊ वृत्ती व उत्सवमय वातावरणाचा संगम अनुभवता येणार असून, जास्तीत जास्त मुळशीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी केले आहे.

कुस्ती चाहत्यांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!