Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकछत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या पावन भूमीत हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावला जातो, हा निधर्मी प्रशासनाचा मुजोरपणा आहे. सुरक्षा तपासणीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘सीटीईटी’ (CTET) परीक्षेच्या केंद्रावर हिंदू महिलांचे पवित्र मंगळसूत्र आणि दागिने उतरवायला लावल्याच्या निषेधार्थ आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या हिंदूद्वेषी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या सौ. सारिका कोलते आणि रणरागिणी शाखेच्या कु. श्रुती सिरसाट यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रियंका लोणे म्हणाल्या की, हिंदू धर्मात मंगळसूत्र हे केवळ सौभाग्यलेणे नसून ते श्रद्धेचे प्रतीक आहे. अन्य धर्मीयांच्या धार्मिक चिन्हांच्या बाबतीत ‘धार्मिक स्वातंत्र्य’ जपणाऱ्या प्रशासनाला केवळ हिंदूंच्याच दागिन्यांमध्ये ‘मेटल’ का दिसते? हा दुजाभाव आता खपवून घेतला जाणार नाही. भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देते. परीक्षेच्या नावाखाली हिंदू महिलांची ही विटंबना संविधानाचा अपमान करणारी आहे.परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवायला लावणे हा महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. जर हे दागिने चोरीला गेले असते, तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असती का? असा संतप्त सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
या वेळी मागण्यामध्ये दोषी केंद्र प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) हिंदूंच्या धार्मिक अलंकारांना (मंगळसूत्र, जोडवी, नथ, बिंदी) परीक्षेला बसताना मुभा असल्याचे स्पष्ट परिपत्रक काढावे. तसेच भविष्यात असा प्रकार घडल्यास तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा...

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!