Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांक‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील शस्त्रप्रदर्शनातून राष्ट्रभक्तीचा जागर!

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील शस्त्रप्रदर्शनातून राष्ट्रभक्तीचा जागर!

दिल्लीत शिवकालीन शस्त्रसंग्रहालय’ उभारण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आश्वासन 

 

 

विद्यार्थी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीतील भारत मंडपम् येथे झालेल्या भव्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील स्वराज्य का शौर्यनाद’ या प्रदर्शनीद्वारे राष्ट्रभक्तीईश्वरीकृपा आणि शौर्याची शक्ती यांचा अद्वितीय संगम साधला. भारत मंडपम प्रांगणातील हॉल क्र. १२ मध्ये १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत या प्रदर्शनीमध्ये शिवकालीन शस्त्रप्रदर्शनवंदे मातरम प्रदर्शनआध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे प्रदर्शनयांसह ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते.

`   या प्रदर्शनात विद्यार्थीपालकहिंदुत्वनिष्ठ आणि विविध मान्यवरांना शिवकालीन शस्त्र केवळ पाहण्यासाठीच नव्हेतर तेजस्वी राष्ट्रपुरुषांच्या काळातील शस्त्रे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी देण्यात आली. या दैवी स्पर्शातून हिंदवी स्वराज्याच्या काळातील पराक्रम आणि शौर्य याची जिवंत अनुभूती उपस्थितांच्या मनात निर्माण झाली. या निमित्ताने दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्लीत कायमस्वरुपी शिवकालीन शस्त्रसंग्रहालय’ स्थापन करण्याचे आश्वासनही दिले.

    या प्रदर्शनाला भारताचे माजी सरन्यायाधीश श्री. उदय लळीतकेंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावतकेंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईककेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठराज्यसभा सदस्यतसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. सुधांशू त्रिवेदीदिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा यांसह संत-महंतप्रशासकीय अधिकारीवरिष्ठ पत्रकारसंपादकसाहित्यिकपोलीस अधिकारीउद्योगपतीअधिवक्तेलष्करी अधिकारीहिंदू संघटनांचे प्रमुख अशा सहस्रो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    या वेळी दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहिले. विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्त्रांची बनावटत्यांतील बारकावेत्यांचा उपयोग आणि त्यामागील विज्ञान प्रत्यक्ष जाणून घेतले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळेधर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधतइतिहासातून राष्ट्रप्रेरणा घेऊन समाजकार्य व राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.

    शिक्षिका श्रीमती सारिका शर्मा म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शस्त्र हाताळत इतिहासाची अनुभूती घेतली. या अनुभवामुळे त्यांच्यात राष्ट्रगौरव आणि आत्मसन्मान जागृत झाला.’ विद्यार्थिनी कु. पूजा कौशिक म्हणाली, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्यातून मला राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली,’ तर कु. आराध्या (इयत्ता ७ वी) म्हणाली, ‘मी मोठी होऊन झाशीच्या राणी लक्ष्मीबाईप्रमाणे राष्ट्रासाठी कार्य करणार!’ या प्रदर्शनामुळे विद्यार्थीपालकशिक्षक आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये स्वाभिमानशौर्य आणि सनातन संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दृढ झाली आहे. शौर्यजागरापासून राष्ट्रजागरापर्यंत’ या ध्येयाने आयोजित हे प्रदर्शन दिल्लीच्या सांस्कृतिक इतिहासातील प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!