Homeमुळशीलवळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा

लवळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा

मुळशी : लवळे गावात संविधान दिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी (२६ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सकाळीच प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी थोर स्वातंत्र्यसैनिक व महान व्यक्तींच्या वेशभूषेत गावातून फेरफटका मारत भारत माता आणि भारतीय संविधानाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

ग्रामपंचायत भवनाच्या दर्शनी भागावर आकर्षक पद्धतीने तयार केलेली संविधान उद्देशिका लावण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधान उद्देशिकेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे संविधान उद्देशिकेचे वाचन केले. बुद्धवंदनाही यावेळी सादर करण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तर सिंबायोसिस लॉ कॉलेज, लवळे येथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी गावकऱ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने संविधान उद्देशिकेच्या ५० प्रतींचे वाटप करण्यात आले. तसेच गावपातळीवर नियमित कायदेविषयक सल्लागार शिबीर आयोजित करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

कार्यक्रमाला सरपंच रंजित राऊत, उपसरपंच राणीताई केदारी, सदस्य संजय सातव, राहुल खरात, बाळासाहेब राऊत, शिवराम सातव, सारीकाताई कळमकर, वर्षाताई राऊत, सुजाताताई मोरे, सायलीताई सातव, नर्मदाताई टकले, साधनाताई सातव, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. डी. साकोरे, कर्मचारी दादा वीर, ज्योती गायकवाड, रुपाली नलावडे, मंदा गोठे, अक्षदा क-हेकर, विद्यानंद कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका खोमणे मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, उपाध्यक्ष सतीश आल्हाट, ग्रामस्थ अतुल खरात, शुभम गायकवाड, दिपक केदारी, व्हा. चेअरमन उत्तम केदारी यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले.

सिंबायोसिस कॉलेजचे प्राचार्य अभ्यंकर सर, समन्वयक प्रांजल काळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संविधान मूल्यांची जपणूक आणि जागृतीचा संदेश देत लवळे ग्रामपंचायतीचा संविधान दिन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!