Homeमुळशीमुळशी तालुक्यातील शेतकरी अरुण राऊत यांचे उपोषण संपुष्टात; न्याय मिळवण्यासाठी लढा सुरूच...

मुळशी तालुक्यातील शेतकरी अरुण राऊत यांचे उपोषण संपुष्टात; न्याय मिळवण्यासाठी लढा सुरूच ठेवणार

मुळशी (पौड):  मुळशी तालुक्यातील लवळे गावातील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी भुमी अभिलेख कार्यालय मुळशी पौड विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सलग सतराव्या दिवशी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या सोहळ्यात, पौड पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी आणि बावधन पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या विनंतीवरून तसेच राऊत यांचे कुटुंबीयांनी केलेल्या कळकळीच्या विनंतीने, राऊत यांनी उपोषण सोडले. पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या हस्ते शितपेय (ज्यूस) घेत उपोषण सोडले.

राऊत यांनी आपल्या उपोषणाच्या सोडण्यासंबंधी सांगितले की, भुमी अभिलेख विभागाने मला योग्य निर्णय आणि वागणूक दिली नाही. मी उपोषण सोडले असले तरी न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार आहे. मुळशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, पण न्याय मिळवणे अवघड आहे. त्याचप्रमाणे, मुळशी तालुक्यात पैशाचा खेळ सुरू आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.

अरुण राऊत यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जर भुमी अभिलेख विभागाच्या तक्रारींबाबत अडचणी येत असतील, तर शेतकऱ्यांनी त्यांना मदतीसाठी संपर्क साधावा असे सांगितले. “आपण सर्व बाबी तपासून योग्य पद्धतीने निर्णय घेऊ,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

पौड पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी राऊत यांना समजावून सांगितले की, “उपोषण हा कोणताही पर्याय नाही. तुमचा कागदोपत्री लढा सुरू ठेवा, आम्ही तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.”

भारतीय जनता पार्टीचे सुनील शिंदे यांनी मंत्री मोहोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर राऊत यांचा संपर्क साधला, आणि भूमी अभिलेख अधीक्षक प्रभाकरजी मुसळे यांची भेट घेऊन सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवसेना नेते आबासाहेब शेळके यांनी राऊत परिवाराच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.

मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी, राऊत परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तुषार अरुण राऊत यांनी मुळशी तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!