Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकमणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!

मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!

नवी दिल्ली – दिल्लीतील भारत मंडपम् येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात’ भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवाने उपस्थितांमध्ये वीरश्री, राष्ट्रभक्ती आणि आत्मसंरक्षणाची तीव्र जाणीव जागवली.

          महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन, मणिपूर राज्याच्या पारंपरिक थांग-ता युद्धकलेचे तलवार, भाला व ढालींसह सादरीकरण, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून महिलांची छेडछाड व धर्मांधांकडून होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्याची वास्तवदर्शी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

          विशेष आकर्षण ठरले ते अफजलखान वधाचे रोमांचकारी सजीव चित्रण! पहेलगाम येथील दहशतवादी आक्रमणाला शिवकालीन रणनितीच्या माध्यमातून कसे चोख प्रत्युत्तर देता येऊ शकते, हे स्वसंरक्षणाच्या विविध प्रकारांसह प्रभावीरीत्या मांडण्यात आले. या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक थरारून गेले.

          मणिपुरी थांग-ता युद्धकलेतील तलवार (थांग), भाला (ता), ढाल आणि युद्धतंत्र यांचे शास्त्रशुद्ध, शौर्यपूर्ण सादरीकरण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. कोल्हापूरस्थित ‘सव्यासची गुरुकुलम’ संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शौर्यप्रदर्शनात शिवकालीन युद्धतंत्र आणि मराठी शस्त्रपरंपरेचा प्रभावी समन्वय साधण्यात आला. यामध्ये शस्त्रांचा प्रत्यक्ष वापर, संकटसमयी आत्मरक्षण, महिलांवरील छेडछाडीच्या प्रसंगी बचाव, तसेच अनेकांकडून होणाऱ्या आक्रमणाला धैर्याने प्रतिकार कसा करावा, याची सजीव प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

          यासोबतच ऋषी-मुनींनी सांगितलेल्या सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भूमीनमस्कार तसेच विविध पारंपरिक व्यायामप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या व्यायामपद्धती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणाऱ्या असून भारतीय संस्कृतीतील आरोग्य व शौर्य यांचा अविभाज्य संबंध अधोरेखित करतात.

          या वेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार श्री. सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, प.पू. शांतिगिरी महाराज, पू. पवन सिन्हा गुरुजी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह हजारो धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!