Homeपुणे / पिंपरी-चिंचवडप्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे : ना. चंद्रकांत पाटील

प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे : ना. चंद्रकांत पाटील

‘मानसी’ उपक्रमांतर्गत एक हजाराहून अधिक मुलींचा सहभाग; महालक्ष्मी लॉन्समध्ये योग सादरीकरण

पुणे (कोथरूड,दि.२०) : महिलांचे जीवन खडतर असून त्यांना अनेक जबाबदाऱ्यांमधून स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करावे लागते. त्यामुळे आनंदी व निरोगी आयुष्यासाठी प्रत्येक महिलेने नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ‘मानसी’ या उपक्रमांतर्गत कोथरूड वस्ती भागातील मुलींसाठी आयोजित केलेल्या योग एकत्रिकरण कार्यक्रमात ते बोलत होते. महालक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात सुमारे एक हजारहून अधिक मुलींनी सहभाग नोंदवत विविध योग प्रात्यक्षिके सादर केली.

ना. पाटील म्हणाले, “स्त्रियांच्या जीवनात मासिक पाळीपासून प्रसूती वेदना व अन्य शारीरिक व मानसिक आव्हाने असतात. या सर्वांवर मात करून त्या जबाबदाऱ्या पार पाडतात. मात्र, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही चिंतेची बाब आहे. योगामुळे केवळ शरीर नव्हे तर मनही संतुलित राहते, त्यामुळे योग हे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन ठरते.”

या वेळी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, योग गुरु मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मानसी’ उपक्रमामुळे वस्ती भागातील मुलींमध्ये योगाभ्यासाबाबत आवड निर्माण झाली असून, पुढील काळात पुणे शहरातही या उपक्रमाचा विस्तार करण्यात येईल, असे ना. पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमात काही महिलांनी पारंपरिक वेशभूषेत योग सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!