Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकटी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! -...

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन

नागपूर/पणजी : आज अहमदाबाद येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या टी-२० विश्वचषक २०२६ अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशात चालू असलेल्या १०,००० कोटी रुपयांच्या अवैध सट्टेबाजी रॅकेटचा उलगडा होत आहे. हाय-टेक ॲप्स व ऑफशोअर सर्व्हरद्वारे हा घोटाळा चालवला जात असून, रायबंदर, पणजी येथील जागरूक नागरिक श्री. दिलीप शेट्ये यांनी पणजी पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. नागपूर येथे एका जागरूक नागरिकाने इ-मेलद्वारे तक्रार नोंदवली असून, या तक्रारींना हिंदू जनजागृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT)मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.
काही प्रमुख वृत्तपत्रांत या सट्टेबाजीविषयी वृत्त प्रसिद्ध झाले आहे. खरे तर याची सुमोटो दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करायला हवी होती. सुराज्य अभियानाने म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारी अवैध सट्टेबाजी भारताच्या जागतिक प्रतिमेला तडा देणारी आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होत असून भारतीय क्रिकेटची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. खरे तर क्रिकेटच्या निमित्ताने सट्टा-जुगार मोठ्या प्रमाणावर चालतो. हे चालवणारे काही ठराविक लोक असतात, हे तपासयंत्रणांना माहिती असते. अनेक सट्टेबाजांना पकडल्याच्या बातम्या तर येतात; मात्र पुन्हा सट्टाबाजार बिनबोभाट कोणाच्या आशीर्वादाने चालू रहातो, हे शोधण्याची, तसेच छोट्या माश्याऐवजी मोठा मासा पकडण्याची नितांत गरज आहे.
                                                                                                       
या संदर्भात सुराज्य अभियानाने मागणी केली आहे की, १०,००० कोटींच्या या आकड्याची भीषणता लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ संबंधित प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून या माहितीच्या स्रोताची तपासणी करावी आणि सट्टेबाजांचे नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त करावेत. जप्त रक्कम जनहिताच्या योजनांसाठी वापरावी. केंद्र सरकारने संमत केलेल्या ‘ऑनलाइन गेमिंग कायदा २०२५’नुसार ही कारवाई करावी, ज्यात अवैध सट्टेबाजीला मदत अजामीनपात्र गुन्हा आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) व सायबर सेलने हवाला मार्ग व डिजिटल पेमेंट गेटवेज बंद करावेत. स्थानिक बुकी आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेट यांच्यातील संबंधांचा शोध घेण्यासाठी राज्य स्तरावर तात्काळ ‘विशेष तपास पथक’ स्थापन करावे.
आपल्या देशाची आणि क्रिकेटची जगभरात बदनामी होऊ नये, यासाठी सामना संपण्यापूर्वीच या रॅकेटवर देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईक होणे गरजेचे आहे, असे सुराज्य अभियानाने म्हटले आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि राष्ट्रीय हितासाठी सुराज्य अभियान या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!