Homeपुणे / पिंपरी-चिंचवडजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक; नागरिकांच्या...

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक; नागरिकांच्या सुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना राबवण्याचे निर्देश

पुणे :  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत बोलताना श्री. डुडी यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल्ल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डुडी यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील जुने आणि धोकादायक पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलक, रेल्वे पूल यांची ७ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा. तपासणीत धोकादायक ठरलेली स्थळे तातडीने काढून टाकावीत. कार्यवाही करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.”

पावसाळ्यात धोकादायक रस्ते आणि पर्यटनस्थळी बॅरिकेड्स लावावेत, दिशादर्शक फलक उभारावेत, आणि वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने अतिरिक्त कर्मचारी तैनात करावेत. तसेच संभाव्य धोकादायक ठिकाणी मॉकड्रील आयोजित करून प्रशासन सज्ज ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

डुडी यांनी यावेळी दिलेले महत्त्वाचे निर्देश:

  • दरडप्रवण गावांत नागरिकांना पूर्वसूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी.
  • पूररेषेखालील अतिक्रमणे हटवून सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात.
  • आरोग्य विभागाने औषधे, खाटा, रक्तपेढी, रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात.
  • महावितरणने वीज खांब, रोहित्र, तारा यांची तपासणी करावी.
  • अपघातप्रवण भागांमध्ये वाहतूक व्यवस्थापन आणि जीवरक्षकांची नियुक्ती करावी.
  • आपदा मित्रांच्या कार्यशाळा घेऊन चांगले कार्य करणाऱ्यांना सन्मानित करावे.

पालखी सोहळा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डुडी यांनी मार्गांवरील अतिक्रमणे आणि धोकादायक वृक्ष हटवून रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्ट्रक्चरल ऑडिटसाठी तज्ज्ञ पॅनेल स्थापन करण्याची सूचना दिली. तसेच जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणी विशेष उपाययोजना राबवण्याचा आग्रह धरला.

पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी जिल्ह्यातील धोकादायक स्थळांची पाहणी सुरू असून, दर १५ दिवसांनी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय बैठक घेण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, महानगरपालिका, महावितरण, वनविभाग, हवामान विभाग आदी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!