Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमुंबई रोडवरील सोनमोहर ट्रीचे पिवळ्या फुलांचे कार्पेट मुंबई प्रिंट न्यूज झेडडब्ल्यूएस 70

मुंबई रोडवरील सोनमोहर ट्रीचे पिवळ्या फुलांचे कार्पेट मुंबई प्रिंट न्यूज झेडडब्ल्यूएस 70


मुंबई : वाढत्या उष्म्याने मुंबईकरांच्या जीवाची काहिली झालेली असताना रस्त्याच्या कडेला फुललेला सोनमोहोर आणि जमिनीवर पसरेला पिवळ्या फुलांचा सडा डोळ्यांना सुखद गारवा देतो आहे. प्रशस्त रस्ते असोत किंवा आतल्या गल्ल्या… तेथील सोनमोहोराची झाडे बहरली आहेत. त्याच्या नाजूक पिवळ्या फुलांचा सडा सर्वत्र पहायला मिळतो आहे. सोनमोहोराच्या झाडाखालून जाताना होणारा पिवळ्या फुलांचा वर्षावही भर उन्हाळ्यात मन प्रसन्न करतो आहे.

सिमेंट कॉंक्रीटचे जंगल असलेल्या मुंबईत उन्हाळा सुरू झाल्यापासून सोनमोहोराने आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात केले आहे. एरव्ही रस्त्याच्या कडेला शांतपणे उभे राहून सावली देणाऱ्या या झाडांना वसंत ऋतू आला की चांगला बहर येतो. हिरव्यागार पानांनी डवरलेल्या झाडांमध्ये ही पिवळी धम्मक फुले उठून दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या परिसराचे सौंदर्यही उठून दिसते. उन्हाळा प्रचंड वाढलेला असताना सोनमोहोरानेही आपली फुलांची उधळण सुरू केली आहे.

या फुलांना मंद सुगंध येतो. त्यांचा वर्षाव असाच जून महिन्यापर्यंत सुरू असतो. बहावा या वृक्षाची फुलेदेखील पिवळी असतात मात्र या वृक्षाचे तुरे जमिनीच्या दिशेने वाढतात. तर सोनमोहोराचे तुरे आकाशाच्या दिशेने वाढत जातात. त्यामुळे संपूर्ण झाडच पिवळ्या फुलांनी आच्छादून जाते. सोनमोहोरोचे झाड डेरेदार वाढते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी केली तरी झाड त्याला चांगला प्रतिसाद देते. छाटणीनंतरही झाडाच्या फांद्या पुन्हा छान वाढतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या झाडांमुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होत असल्याची माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा

सोनमोहोराची सुमारे लाखभर झाडे सोनमोहोराचे शास्त्रीय नाव पेलटॉफोरम टेरोकारपम असे आहे. तो फेबॅसी कुलातील वृक्ष आहे. हा वृक्ष विदेशी जातीतील असून इंडो चायना, दक्षिण पूर्व आशिया ते ऑस्ट्रेलिया भागातील हे मूळ वृक्ष आहे. मुंबईत एकूण १ लाख तीन हजार सोनमोहोराची झाडे असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!